लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, शहरातील कोरोना सेंटर हळूहळू हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र, या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, पण पैसे मोजून, अशीच स्थिती शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने प्रचंड मोठा वेग घेतला आहे. कोरोना वाढीचा हा वेग पाहून आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. सातारा शहरामध्ये सध्या दोन कोरोना सेंटर आहेत. ही दोन्ही कोरोना सेंटर आता हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना आता सर्वसामान्य नागरिकांना नाइलाजास्तव खासगी हॉस्पिटलचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे. मात्र, खासगी हॉस्पिटलमधील दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. दिवसाला १० ते १५ हजार रुपये भाडे रुग्णाच्या नातेवाइकांना न परवडणारे आहे. त्यामुळे आता शासनाने बंद पडलेली कोरोना सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. सातारा शहरामध्ये छोटी मोठी हॉस्पिटल मिळून ४३ हॉस्पिटल आहेत. यातील केवळ २४ रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि कोरोनावर उपचार होण्यासारखी हॉस्पिटल आहेत; पण यांचे चार्जेस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.
चौकट ः अशी आहे आकडेवारी
कोरोना रुग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड
२९४५-१८८९
शासकीय रुग्णालय
१७२३-१३१९
खासगी रुग्णालय
२४३८-१६१८
..............
ऑक्सिजन
११२४
८११
५३६
...........
आयसीयु
६२३
४५२
२८४
......
व्हेंटिलेटर आयसीयू
२७६९
१९४३
१५३३
........
शासकीय रुग्णालय
२०९
......
खासगी रुग्णालय
२३९५
रिकामे
१५३७
........
खासगी रुग्णालय काय दर?
ऑक्सिजन
६७०
आयसीयु
१३२६
.......
व्हेंटिलेटर आयसीयू
६८०
चौकटः
राखीव खाटा नावालाच
खासगी रुग्णालयामध्ये राखीव खाटा असतात हे अनेक नातेवाइकांना माहिती नाही. सरसकट सर्वांनाच दाखल करून घेतले जाते. मात्र, दोन दिवसाचे ५० ते ६० हजार रुपये बिल होत असल्यामुळे अनेक जणांचा कल हा शासकीय रुग्णालय आणि कोरोना सेंटरमध्ये उपचार घेण्याकडे असल्याचे पाहायला मिळत आहे.