शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शंभू महादेवाच्या शिंगणापूरात बहरलंय बेल रोपवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 2:35 PM

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांच्या कल्पनेतून साकार धार्मिकदृष्ट्या अर्पण करण्याला महत्त्व वन विभागाकडून मूर्त स्वरूप

म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.

मागीलवर्षी श्रावण महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिखर शिंगणापूर येथे देवर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या १७६.५७ हेक्टर राखीव वनक्षेत्राची पाहणी करत असताना त्यांनी या ठिकाणी बेल रोपवन तयार करण्याची कल्पना मांडली. तसे केल्यास शंभू महादेवाला अर्पण करण्यासाठी आवश्यक बेलपत्र भक्तांना सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार माणच्या वन विभागाने राणंद येथील रोपवाटिकेत बेलाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. 

रोपे तयार केल्यानंतर या रोपांची शिंगणापूर येथील वन विभागाच्या जागेत  लागण करण्यात आली. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर ६५० बेलाची रोपे लावली. बेल रोपवन तयार करण्यासाठी महाबळेश्वर, कास, ठोसेघरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एकूण दोन लाखांची आर्थिक मदत केली. फक्त लागवड करूनच वन विभाग थांबला नाही तर वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नितीन जगदाळे व वनपाल महेंद्र पवार यांनी या रोपांची पूर्ण काळजी घेतली. वेळोवेळी किटकनाशके, औषधे फवारणी करून या रोपांचे संरक्षण करण्यात आले. याचा परिपाक म्हणून या रोपवनात लागवड केलेली शंभर टक्के रोपे जिंवत असून त्यांची चांगली वाढ होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे येथील वन विभागाच्या इतर क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात बेलांच्या रोपांची लागवड केल्यास या तीर्थक्षेत्राला बेलांच्या रोपांनी सुशोभित करता येईल. तसेच शिंगणापूर येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच वन पर्यटनही वाढीस लागेल. शिंगणापूर येथे साकारलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वजण वन विभागाला धन्यवाद देत आहेत.