राज्य शासनाच्या शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहिमेचा शहरातील मंगळवार पेठेत प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुहास पवार, नगरसेवक सादीक इनामदार, रूपाली प्रमोद, नीलिमा पाटील, गौरी जाधव, सोनाली जोशी, विद्यादेवी जाधव, राजेंद्र अलोणे, विजय कुलकर्णी, नामदेव जाधव, अंगणवाडी सेविका उषा साळुंखे, ए. आर. माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक सौरभ पाटील म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. या सर्वेक्षणामध्ये काम करणाऱ्या सरस्वती विद्यामंदिरच्या शिक्षक, सेवक तसेच आशा सेविकांना मदत केली जाईल. नागरिकांनीही सर्वेक्षणासाठी येणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
फोटो : ०६केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडच्या मंगळवार पेठेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या उपस्थितीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण सुरू करण्यात आले.