शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

सेवागिरी रथोत्सवात भरला भक्तीचा मेळा

By admin | Published: December 21, 2014 12:31 AM

पुसेगाव यात्रा : माजी मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत निघाली शाही मिरवणूक

पुसेगाव : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या जय घोषात बेलफूल गुलालाची उधळण करत भक्तिमय व उत्साही वातावरणात शनिवार, दि. २० रोजी श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे ८ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली. मंगळवारी पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे हस्ते सकाळी दहाला मानाच्या रथाचे पूजन करुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, बाळासाहेब सोळस्कर, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सभापती कल्पना मोरे, प्रभावती चव्हाण, किरण बर्गे, उद्योजक एल. एम. घाडगे, सरपंच मंगल जाधव, उपसरपंच संदीप जाधव, रणधीर जाधव, मानाजीकाका घाडगे, महेंद्र नलवडे, अशोक गोडसे, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी राहुल देसाई उपस्थिती होते. यावेळी टाळमृदगांच्या गजरात ढोलताशे व बॅण्डपथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी गजराज आणि अश्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी नारळ, बेलफुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अपर्ण केल्याने मानाचा रथ नोटांनी शृंगारला होता. रथाच्या उजव्या बाजूने भाविकांची जाण्याची व डाव्या बाजूने येण्याची व्यवस्था केली होती. सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तांना बुंदीचा प्रसाद दिला जात होता. सेवागिरी मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथयात्रेस मंदिर ते यात्रास्थळ (मुख्य रस्ता), पोस्ट कार्यालय मार्गे मंदिर अशी बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करुन नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. (वार्ताहर)