शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शिवारात घुमताहेत भलरीचे स्वर...!

By admin | Published: July 19, 2016 10:51 PM

बळीराजा शेतात व्यस्त : कास बामणोली परिसरात भात लावणीस वेग

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास बामणोली परिसरात भात लावणीस सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ‘भाताच्या शिवारात रामा हो रामा ... रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी झिरमिरी.. माझ्या बंधू च्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं ... मारुती ला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते ... कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईचे डोंगरी गजबारल्या तोरणी...,’ अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादू लागले आहेत.कास बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्र्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल माती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट व डोंगर उताराच्या तसेच लाल मातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी या सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भाताच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळी राजाचा दिवस संध्याकाळी सात पर्यंत शेतातच मावळत असल्याचे या परिसरात दिसत आहे. (वार्ताहर)परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही तुरळक ठिकाणी अजूनही ओढे अथवा विहिरीतील पाणी साठवून भात लावणी होत आहे. भात लावणी करताना आजही ही पारंपरिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवून आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा शेतकरीपैरा : परस्परांना मदत करण्याची प्रथावस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच या परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.