शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 8:20 PM

चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे घातकी मानले जाते.

ठळक मुद्देरानफुलांचा मेळा : रामेटा, निगडी, महाकारवी, निरडी आदी फुले

पेट्री: सातारा शहराच्या पश्चिमेस भांबवली पुष्प पठारावर पावसाळ्यात रंगोत्सव भरतो. तर हिवाळ्यात भांबवलीच्या जंगलात अनेक रानफुले उमलली आहेत. हा फुलोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कास पठारपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. त्याचबरोबर भांबवलीचे जंगल औषधी वनस्पतीचं आगारच बनलं आहे.

भांबवली परिसर झाडेझुडपे विविध रंगांच्या फुलांनी बहरली आहे. गुलाबी, पिवळी, निळी, राखाडी, पांढरी आदी रंगाची उधळण केलेला रानफुलांचा खजिनाच भांबवलीत आहे. बरीचशी फुले पांढºया रंगाची तर सोनेरी रामेटाचा बहर काही औरच आहे. या परिसरात भेट देणाºया पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.भांबवलीतला रानफुलांचा मेळा हा अपूर्व व नेत्रदीपक आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यत विविधरंगी रानफुलांचा बहर पाहून मन प्रसन्न तर होते. चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे घातकी मानले जाते.

हिरव्या टॉवररुपी झुडपावरील निळी म्युतीन फुले मनमोहक दिसतात. महाकारवी सात वर्षांतून फुलते, तर निळी विटाकारवी दरवर्षी फुलते. निगडीची तीन पाने बेलपत्र म्हणून वापरली जातात. निगडीचा वापर वनोऔषधी होतो, तर त्याची आकाशी रंगाची फुले सुंदर व आकर्षक दिसतात. निरडीची फूल लाल रंगाची असून, फुलांची भाजी चविष्ट असते. गंगोत्रीच्या लाल फुलांचा गुच्छ व त्यावर डोलणारा पांढरा केसर मनाचा ठाव घेत असून, हे झुडुप तापावर रामबाण उपाय म्हणून मानले जाते. पांढºया रंगाची भालग्याची फुले आकाशातील चांद ताऱ्यांसारखी लुकलुक करत आहेत, असे भासते.

पिवळी शेळकीची फुलं रानातिलकाना कोपºयात डुलताना पाहावयास मिळतात. निळा काटेरी सराटा म्हणजे जणू काही निळ्या रंगाचे पाखरूच. भांबवली परिसरातील रानफुलांचा मेळा म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव असतो. निसर्गाचा तो नजारा शब्दबद्ध करू शकत नाही. सप्टेंबरमध्ये रानफुले फुलतात ते माहीत होते. पण जानेवारीत रानफुलांचा मेळा भरतो, हे बहुतेकांना माहीतच नाही. विविध प्रकारची औषधी झाडेझुडपे जंगलात असून, प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मुरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल आदी आहेत. 

  • भांबवलीचे पुष्ठ पठार अद्यापही दुर्लक्षित

भांबवली येथील पठारावर मोठ्या प्रमाणावर फुले उमलत असून, जग त्यापासून अनभिज्ञ आहे. काय दैवदुर्विलास उत्तराखंडाची फ्लॉवर व्हॅली फक्त आठ किलोमीटरवर पसरली आहे. त्यापैकी कास पठार तसेच भांबवली पुष्प पठार हे तीन तालुक्यांत सातारा, जावळी ते थेट पाटणच्या परिसरापर्यंत पसरले आहे. त्याचा विस्तार खूप मोठा असून, त्याची मोजणी झालेली नाही. या पठारावर सर्व प्रकारची व दुर्मीळ फुले बहरतात. भांबवलीसारखे विर्स्तीण पुष्प पठार अद्यापही दुर्लक्षित आहे.

  • उगवते पर्यटनाचे दालन

भांबवली परिसरातून उरमोडी जलाशय, शिवसागर (कोयना) जलाशय, त्रिवेणी संगम, वासोटा किल्ला, सज्जनगड आदी ठिकाणावरून दूरवर दिसतात. दुर्बीण असल्यास अतिशय उत्तम आहे. भांबवली परिसरातील पठारावर व जंगलात बारमाही फुले नजरेत येतात; पण मुख्यत्वे करून पावसाळा व हिवाळ्यात रानफुलांचा बहर काही औरच आहे. साताºयातील उगवते पर्यटनाचे दालन म्हणून भांबवलीकडे पाहिले जाते.कोट..भांबवली हे फुलांचे गाव म्हटले तर वावगे ठरू नये. या हिवाळ्यात भांबवलीला जरूर भेट द्या. रानफुलांशी संवाद साधा, त्यांना तोडू नका वा इजा पोहोचवू नका. हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे संरक्षण व पावित्र्य ठेवणे पर्यटकांच्या हातात आहे.-रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख,स'ाद्री पठार विभाग विकास संघ, साताराफोटो १५ पेट्री नावाने सर्व फुले घेणे

 

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर