कुडाळ : जावळी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी भानुदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई येथील बँकेच्या गोल देऊळ येथील मुख्य कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये उपाध्यक्षपदाची ही निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपद ज्येष्ठ संचालक हणमंत गणपत पवार यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेवर भानुदास जाधव यांची वर्णी लागली आहे. भानुदास जाधव हे अभयलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक आहे. त्यांना सहकाराचा अनुभव आहे. निवडीनंतर माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष राजाराम ओंबळे व इतर सहकारी संचालकांबरोबर मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून बँकेच्या भरभराटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
‘भानुदास जाधव हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व असल्याने आगामी काळात ते बँकेच्या हितासाठी प्रयत्न करून बँकेला प्रगतिपथावर नेतील,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी अध्यक्ष राजाराम ओंबळे, विक्रम भिलारे, आनंदराव सपकाळ, हणमंत पवार उपस्थित होते. निवडीनंतर आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील यांनी कौतूक केले.
फोटो :
जावळी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भानुदास जाधव यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.