लोकमत न्यूज नेटवर्कऔंध/दहिवडी : पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सहभागी गावांनी जलसंधारणाची कामे जीव तोडून केली. यामध्ये खटाव तालुक्यातील भोसरे व माण तालुक्यातील बिदाल येथील ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले. दोन्ही गावांना अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकाची बक्षिसे विभागून मिळाली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.बालेवाडी, पुणे येथे रविवारी रात्री वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. स्पर्धेतील प्रथम क्रमांक वर्धा जिल्ह्यातील काकडदरा या गावास मिळाले आहे. काकडदरा गावाने ५० लाखांचे बक्षीस पटकाविले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नीता अंबानी, अभिनेता शहारूख खान प्रमुख उपस्थितीत होते. अभिनेता आमिर खान आणि किरण हे स्वाइन फ्लू झाल्याने कार्यक्रमास अनुपस्थित होते. आमिर खान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाला. त्यानेच ही माहिती दिली.बक्षीस मिळणार याची खात्री असल्याने भोसरे आणि बिदाल या दोन्ही गावांतील ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते. स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे बक्षीस खटाव तालुक्यातील भोसरे गावाला विभागून मिळाले. पंधरा लाखांचा धनादेश, सन्मानचिन्ह या गावाला मिळाले. तसेच माण तालुक्यातील बिदाल या गावाला तिसºया क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. या गावाला दहा लाखांचा धनादेश व सन्मानचिन्ह मिळाले. ही आनंदवार्ता दोन्ही गावांत समजताच फटाके वाजवून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भोसरे, बिदालला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:16 PM