यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना गायकवाड, शिवराज जगताप, सरपंच युवराज भोईटे, उपसरपंच सुहास महाडिक, लघुपाटबंधारे विभागाचे सूर्यवंशी, ग्रामसेवक विकास पाटील, बबन भंडलकर, महादेव गावडे, बाजीराव जाधव, रमेश जाधव, कुलदीप माने, अभिजित जगताप, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय चरेगावकर, सुवर्णा जंगम, युवराज महाडिक आदी उपस्थित होते.
ओढ्यातील आणि शिवारातील पाणी कृष्णा नदीत वाहून जाते. ते पाणी साठवण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडे प्रियांका ठावरे तसेच टेंभू ग्रामपंचायत यांनी सतत पाठपुरावा केल्याने १३ लाख रुपये खर्चाचा काँक्रीट साठवण बंधारा मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजन करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळे विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
फोटो : १४केआरडी०३
कॅप्शन : टेंभू, ता. कऱ्हाड येथील साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या प्रियांका ठावरे, पंचायत समिती सदस्या अर्चना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.