शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

पहाटे फिरायला जाणाºयांना सावधान , फलटण शहरात बिबटोबा सीसीटीव्हीत कैद : उत्सुकता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 8:47 PM

फलटण : शहरात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी बिबट्या किंवा वाघ आढळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती. याबाबतची उत्सुकता आता संपली

फलटण : शहरात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी बिबट्या किंवा वाघ आढळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती. याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात मंगळवारी रात्री दीडच्या सुमरास बिबट्या वावरताना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. भरवस्तीत बिबट्याच्या वावरामुळे दहशत कायम आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते, पोलिस, नगरपालिकेने शोध मोहीम राबविली आहे. मंगळवार, दि. २८ रोजी सकाळी साडेपाचला मारवाड पेठेतून एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. हे समजल्यानंतर वन अधिकारी, कर्मचाºयांनी शहर परिसर पिंजून काढला. परंतु त्यांना बिबट्या आढळला नाही. विमानतळ परिसरात काहींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले.

बारस्कर चौकातील एका मंदिरात बुधवार, दि. २९ रोजी सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील गजानन चौकातील सिटीप्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटिव्ही कॅमेºयात रात्री दीड वाजता बिबट्या आवारात फिरताना व त्यानंतर थिएटरच्या तटभिंतीवरून उडी मारून बाहेर जाताना चित्रित झाले. यावरून गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाजार समितीचे सभापती व नगरसेवक रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तेथील रखवालदार व अन्य अधिकारी, कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यासुमारास काही घरांचे पत्रे वाजले होते. यावरून बिबट्या घरावरून गेला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी वन, पोलिस अधिकारी व नगराध्यक्षा नीता नेवसे, मिलिंद नेवसे, पालिका अधिकाºयांशी चर्चा करून याबाबत नागरिकांना जागृत करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत नगरपरिषद व वनखात्याच्या वाहनातून शहरात ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात आली.पहाटे फिरायला जाणाºयांना सावधानतेचे आवाहनविशेषत: पहाटे फिरावयास जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देत वनखाते व पोलिसांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. मात्र सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे.उपनगरांमध्ये ध्वनिक्षेपकावरून सूचनाशहराप्रमाणेच शहरालगतच्या कोळकी, जाधववाडी, ठाकूरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही ध्वनिक्षेपकावरून ग्रामस्थांना माहिती देऊन सावधानता बाळगण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या आहेत.