सातारा : संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असलं तरी सर्वाधिक नुकसान शुक्रवारी पुन्हा एकदा गोडोलीकरांचंच झालं. नाल्यावरील बांधकामं अन् ड्रेनेजची चुकीची व्यवस्था यामुळं गोडोली भागातील कैक घरं अन् वाहनं पाण्यात बुडाली. या परिसरात जणू महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.. परंतु हा महापूर नैसर्गिक नसून मानवी असल्याचा आरोप करत या परिसरातील नागरिकांनी भर पावसात अन् भर पाण्यात आंदोलन केलं.दोन वर्षांपूर्वी पूरस्थिती अनुभविलेल्या गोडोलीकरांना पुन्हा याचा अनुभव शुक्रवारी आला. मुसळधार पावसाने अक्षरश: गोडोलीकरांची तारांबळ उडाली. पाहता-पाहता पाण्याचे लोट दुकानात अन् घरात शिरू लागले. काही करावे, हेच कोणाला समजत नव्हते. अखेर जे व्हायचे होते ते झालेच. दुकानातील आणि घरातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.साताºयात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने गोडोलीकर चिंताग्रस्त झाले. दोन वर्षांपूर्वी गोडोली तळ्याशेजारी असणाºया दुकानात आणि हॉटेलमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या पावसामुळेही हीच परिस्थिती होईल, अशी चिंता व्यावसयिकांना लागली होती. अखेर त्यांची ही चिंता खरी ठरली. केवळ अर्ध्या तासात इमारतीमध्ये बसलेल्या दुकान गाळ्यांमध्ये पाणी शिरले. जेवढे शक्य होते. तेवढे साहित्य दुकानदारांनी आतल्या गाळ्यात नेले. मात्र, पाण्याचे लोट जोरदार असल्यामुळे दुकानदारांचा नाईलाज झाला. सर्व साहित्य पाण्यात भिजले गेले. या इमारतीमध्ये २६ गाळे आहेत. या सर्व गाळ्यांमध्ये पाणी शिरले. किराणा माल, गॅरेज, विविध कंपन्यांची कार्यालये या गाळ्यांमध्ये आहेत. या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दुकान गाळे, वाहनांनी घेतली जलसमाधीसातारा शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका गोडोली परिसराला बसला. अतिक्रमणांमुळे बंदिस्त झालेल्या ओढ्यांमुळे पावसाचे वाहत जाणारे पाणी समतल भागात साचून राहिले होते.या भागातील अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. रस्त्याकडेला पार्क करण्यात आलेल्या वाहनांनीही जलसमाधी घेतली. यामध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले.रस्ता हरवला धुक्यातसातारा शहराला गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. शुक्रवारी दुपारीही शहरात मुसळधार पाऊस झाला.दाट धुके अन् धो-धो बरसणाºया पावसात जणू काही रस्ताच हरवला की काय, अशी प्रचिती आली.गटारे तुडुंब अन्् रस्त्यावर पाण्याचे लोटसातारा शहर व परिसरातील गटारे घाणीने तुडुंब भरल्याने गटारातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. शहरातील सदर बझार, गोडोली या ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाने पाणी समतल भागात साचून राहिले. साचलेले पाणी बाहेर काढताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
बिच्चारी गोडोली.. पाण्यात पुन्हा बुडाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:03 AM