विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोन बहिणी आणि भाऊ यांची जबाबदारी स्वीकारत शिक्षणाला रामराम ठोकला आणि सुरू झाला तो संघर्षमय प्रवास आणि अविरत कष्ट, यासाठी रज्जूतार्इंनी कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत अनेक प्रकारच्या छोटी-मोठी कामे केली, वेगवेगळे व्यवसाय सुरू केले.
आपल्या प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते, त्याचप्रमाणे मलटणमधील रजनी पवार म्हणजेच रज्जूताई! कष्टातून खूप काही मिळवता येतं, खूप काही साध्य करता येतं आणि कष्टानं समाजात एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते, हे रज्जूतार्इंनी दाखवून दिले आहे. आज त्यांचं वय साठ वर्षे आहे.
अगदी सुरुवातीला १९८३-८४ मध्ये भाऊ व बहिणींच्या मदतीने शेतीच्या राखणी घेतल्या. काहीकाळ धुणी भांडीही केली. यातून मिळालेल्या पैशातून मलटणमध्ये मिरची कांडपाचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यासोबत पिठाची गिरणी सुरू केल्याने मलटणसह आसपासच्या गावातील लोकांच्या ओळखी वाढू लागल्या. दरम्यानच्या काळात तार्इंनी लाकडाची वखारही सुरू केली. काहीवेळा स्वत: लाकडंसुद्धा फोडली. यापुढे जाऊन त्यांनी सायकल पंक्चर दुकान टाकलं. मलटणमधल्या सगळ्या सायकलींची पंक्चर काढल्याचे त्या स्वत: सांगतात. वयोमानामुळे आज त्या थकल्याने हे दुकान बंद आहे.रज्जूतार्इंनी असे अनेक छोटे लघू व्यवसाय सुरू केले. त्यात शेवया मशीन, रद्दी डेपो, भंगार दुकान या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आजही यातील काही महिला रज्जूतार्इंच्या प्रेरणेतून स्वत:चे व्यवसाय करत आहेत. भंगार दुकानातून भंगार गोळा करणाºया महिलांना रोजगार मिळवून दिल्याने त्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. रज्जूताई स्वत: भंगार निवडत असत, त्यांनी सुरू केलेला रद्दी डेपो आजही चालू आहे. आजही त्या रद्दी निवडतात अन् बांधतातही. त्या वयाची साठी पार केली असली तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. आजही त्या म्हणतात नवीन काहीतरी करायचंय!मलटणमधील सर्वजण त्यांना रज्जूताई म्हणतात. पुढची पिढी त्यांना रज्जूआत्या म्हणते, तर लहानगे त्यांना रज्जू आज्जी, असे हाक मारतात. अनेकांना त्यांनी मदत केल्याची उदाहरणे आहेत. मलटणमधील एका मुलास साप चावला त्याच्या उपचारासाठी रज्जूतार्इंनी व प्रतापसिंह यांनी घरोघर जाऊन मदत गोळा केली. आज तो मुलगा केवळ तार्इंच्या व प्रतापसिंह यांच्या प्रयत्नातून बचावला.मलटणच्या तरुण मुलांमध्ये रज्जूताई खूप लाडक्या. आपल्या मनातल्या भावना सांगण्यासाठी ही मुलं हमखास त्यांच्याकडे जमतात. सल्ला विचारतात.
रज्जूताई म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अनेकांना केलेली मदत न विसरण्यासारखी आहे. त्यांचा आम्हा मलटणकरांना कायम आदर राहील.-प्रतापसिंह नाईक-निंबाळकर,