लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : ‘गावच्या लोकसंख्येच्या ६० टक्केपेक्षा जास्त लोक आज बिदाल गावात श्रमदानासाठी येत आहेत. असा प्रसंग मी व बिदाल सारख्या गावात श्रमदानातून झालेले काम की माझ्या आयुष्यात कधीही पाहिले नाही. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. बिदाल गाव महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.बिदाल येथे वॉटर कप स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, भगवानराव गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासो काळे, दहिवडीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, सिद्धार्थ गुडंगे, महेश कदम, किशोर साळुंखे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘बिदाल गावात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पाणी अडवण्यासाठी बिदालमध्ये साखळी बंधारा संकल्पना अस्तित्वात आली. सुरुवातीला सिमेंट बंधारे आपण बांधायला घेतले. माणमध्ये याला चांगले यश आले. वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन बिदालने समाधानकारक काम केले आहे. गाव पाणीदार करण्यासाठी माता- भगिनी घराच्या बाहेर पडल्या याचे समाधान वाटते.’ यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यात बिदाल नावलौकिक मिळवेल
By admin | Published: May 19, 2017 11:34 PM