फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

By दीपक शिंदे | Published: October 6, 2024 07:01 AM2024-10-06T07:01:40+5:302024-10-06T07:02:34+5:30

काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत, असे म्हटले होते.

big blow to ajit pawar ramraje naik nimbalkar prepares to join ncp sharad pawar group | फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केल्याने नाराज झालेले रामराजे नाईक-निंबाळकर तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातून बाहेर पडत शरद पवारांच्या गटात लवकरच प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

फलटण तालुक्यावर वर्चस्व असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत जो ठरविला तोच उमेदवार विजयी झालेला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि त्यानुसार उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याची पद्धत त्यांनी अवलंबिलेली आहे. असे असताना यावेळी अजित पवार यांनी आमदार दीपक चव्हाण हेच फलटणचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. या प्रकारामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे दुखावले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत, असे म्हटले होते. त्यानंतरच बहुतेक त्यांची वाटचाल तुतारीकडे होत असल्याचे जाणवत होते. 

स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन उमेदवार ठरविला गेला पाहिजे. फलटणच्या उमेदवारीबाबत असे झालेले नाही. एखाद्या वरिष्ठ नेत्याने उमेदवार ठरविला असला तरी स्थानिक कार्यकर्ते मतदान करत असतात, त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहोत. - रामराजे-नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधान परिषद

 

Web Title: big blow to ajit pawar ramraje naik nimbalkar prepares to join ncp sharad pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.