शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

विक्रमसिंह पाटणकरांवर लोकांची मोठी प्रेमभावना : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:24 PM

‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे.

ठळक मुद्देतालुक्याचा विकास पाहिला; अमृतमहोत्सवी गौरव समारंभ

पाटण : ‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे. आमदारकीच्या काळात ते कधीही माझ्याकडे मला मंत्री करा म्हणून आले नाहीत. ते तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आले,’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.पाटण येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार भास्कर जाधव, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रवादी काँगे्रस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, पाटण पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तेजस शिंदे, सुजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘विक्रमसिंह पाटणकर, पृथ्वीराज चव्हाण आणि मी एकाच व्यासपीठावर येण्याचे कारण शरद पवार हे आहेत. व्यासपीठावर आम्ही पंच्याहत्तरी गाठलेली मंडळी आहोत. आता येणाºया पिढीच्या हाती सत्ता द्यावी.

’ माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या कारकिर्दीत तालुक्यात रस्त्याचे जाळे विणले. डोंगरदºयातील लोकांना रस्त्यांच्या माध्यमातून तालुक्याला जोडले. जर विक्रमसिंह पाटणकर वाड्यात राहत असलेतरी ते नेहमी सर्वसामान्य व डोंगर पठारावर राहणाºया लोकांचा विचार करत असतात.’

सत्काराला उत्तर देताना विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘राजकारणात ५० वर्षे कशी झाली ती समजलीच नाहीत. पाटण तालुक्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, रोजगार पाहिजे. ती स्वप्ने मला पूर्ण करण्याची संधी मिळाली, हेमाझे भाग्य आहे. तालुक्यातील जनतेने नेहमी शरद पवार यांच्यावर प्रेम केले. मी मात्र निमित्त ठरलो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करू शकलो.’ पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुभाष पवार यांनी सूत्रसंचालन तर राजेश पवार यांनी आभार मानले.निवडणूक गोड होणार...विक्रमसिंह पाटणकर यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर लहानसा केक कापण्यात आला. हा केक कापल्यानंतर शरद पवार यांनी स्वत:च्या हाताने सर्व उपस्थितांसमोर विक्रमसिंह पाटणकर यांना भरविला. त्यामुळे २०१९ मधील निवडणूक पाटणकर गटाला गोड जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.पाटण येथे मंगळवारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शरद पवार, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार