सिव्हिल हॉस्पिटल :
जिल्हा रुग्णालयात रोज हजारो रुग्ण येत आहेत. या रुग्णांत सोबत असलेले नातेवाईक दिवस-रात्र रुग्णालयाच्या परिसरात वास्तव्य करतात. काही कामानिमित्त रुग्णालयात रुग्णांजवळ गेल्यानंतर इकडे बाहेर मात्र नातेवाइकांची दुचाकी चोरीला जात आहेत. सर्वाधिक चोरीला जाण्याचे ठिकाण म्हणून सिव्हिल हॉस्पिटल ओळखले जात आहे. तिथून तब्बल आठ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
बस स्थानक:
सातारा बस स्थानकाबाहेर पे अँड पार्क सुविधा तयार करण्यात आल्यामुळे इथून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार घडत नाहीत. परंतु या पार्किंगच्या आजूबाजूलाही अनेक जण दुचाकी पार्क करत असतात. पार्किंगमध्ये पैसे जातील, त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक जण बस स्थानकातील काही कोपरे शोधून दुचाकी उभी करून निघून जातात. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडतेय. त्यामुळे नागरिकांनीही आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करणे गरजेचे आहे.
खासगी हॉस्पिटल:
सातारा शहरातील सिव्हिलप्रमाणे खासगी हॉस्पिटलमध्ये आता दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नातेवाईक रुग्णांजवळ गेल्यानंतर चोरटे काही क्षणातच दुचाकी चोरून नेत आहेत. विशेष म्हणजे या सर्व चोऱ्या भरदिवसा होत आहेत. रात्रीच्या सुमारास क्वचितच चोरीचे प्रकार घडत आहेत.
समर्थ मंदिर :
साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातूनही दुचाकी चोरीची घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. तिथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी हातोहात गायब केल्या जात आहेत. तसेच इमारतीच्या पार्किंगमध्येही पार्क केलेल्या दुचाकीही चोरीला जात आहेत.
देवी चौक:
या चौकातूनही दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला जात आहेत. या ठिकाणी व्यापारी असल्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी नेहमी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी चोरत आहेत. अगदी गुरुवार पेठेतूनही दुचाकी चोरीला जात आहेत.
कोट:
दुचाकी चोरटे अत्यंत हुशार असतात. इथं दुचाकीची चोरी करून दुसऱ्या शहरांमध्ये नेऊन ते विकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बरेचदा तपासाला अडचणी येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक सातारा शहर
चौकट: आकडे काय सांगतात
वर्षभरात जिल्ह्यातील दुचाकी चोरी- ८३
सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत झालेल्या चोरी- ४६
सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत झालेल्या चोरी-३७