शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार ) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
2
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
3
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
4
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
5
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
6
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
7
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
8
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
9
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
10
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
11
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
12
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
13
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल
14
Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज
15
Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'
16
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
17
माधुरी दीक्षित-विद्या बालनच्या नृत्याचा नजराणा! 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक
18
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
19
धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार ठरला, बड्या नेत्यानं शिवबंधन बांधत भगवा उचलला!
20
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...

अब्जाधीश उदयनराजे! आहेत खानदानी श्रीमंत; ट्रॅक्टरपासून फॉर्च्युनरपर्यंत, वाहनांचा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 6:03 AM

खासदार उदयनराजे भोसले हे खानदानी श्रीमंत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: खासदार उदयनराजे भोसले हे खानदानी श्रीमंत आहेत. त्यांना वारसाहक्काने मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळाली आहे. त्याबरोबरच त्यांनी स्वकर्तृत्वानेदेखील त्यामध्ये भर टाकली आहे. एकूण मालमत्तेचा विचार करता ते अब्जाधीश आहेत. 

वारशानेच आहेत अब्जाधीशत्यांना वारशानेच १ अब्ज ७२ कोटी ९४ लाख ४९ हजार रुपयांची संपत्ती मिळाली आहे, तर त्यांच्याकडे स्वत:ची १६ कोटी ८५ लाख ७७ हजार ४८ रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे. २०१९ च्या तुलनेत त्यामध्ये चार कोटींनी वाढ झाली आहे. महागडी वाहने आणि हिरे, मोती, सोन्याचे दागिने याबाबत तर त्यांचा खानदानी रुबाब दिसून येतो. त्यांच्याकडे अगदी ट्रॅक्टरपासून ते जिप्सी, मर्सिडीज, फॉर्च्युनर, ऑडी, स्कॉर्पिओ अशी विविध प्रकारची वाहने आहेत, तर २ कोटी ६० लाख ७४ हजार ३९८ रुपयांचे जडजवाहिर, सोने, चांदीचे दागिने आहेत. असे असले तरी सुमारे २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२ रुपयांचे कर्ज आहे, तर चार फौजदारी खटले प्रलंबित आहेत. 

संजय पाटील यांच्याकडे ४८ कोटींची संपत्तीसांगलीतून दोन वेळा निवडून आलेले आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले खासदार संजय पाटील यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी आहे. पत्नीची जंगम मालमत्ता तब्बल ३० कोटी ५० लाखांनी अधिक आहे. पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी ३२ कोटी ३१ लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत.

विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटींवरकाँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाख ४१ हजार ७३५ रुपयांची आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीच्या तुलनेत ८ कोटी ८० लाख ८४ हजार ७९९ रुपयांनी संपत्तीत वाढ झाली आहे.

टॅग्स :satara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४