म्हसवड : ‘माण-खटाव मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. दळणवळण सुलभ होण्यासाठी गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांबरोबरच गावोगावच्या अंतर्गत रस्त्यांचीही कामे मार्गी लावली आहेत.यावर्षीही मतदारसंघातील रस्त्यांच्या विकास व मजबुतीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर आहे,’ अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ५ हजार ०५४ इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण या लेखाशीर्षकांतर्गत माण-खटाव मतदारसंघातील पुढील रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. खटाव - कुरोली रस्ता सुधारणेसाठी २२ लाख, गोरेगाव-मरडवाक-गुंडेवाडी रस्त्यासाठी २२ लाख, गोपूज-वाकळवाडी-वांझोळी रस्त्यासाठी २२ लाख, औंध-गणेशवाडी-कळंबी-गिरीजाशंकरवाडी रस्ता २२ लाख, चितळी-मायणी-अनफळे-पळसगाव रस्ता १७.५० लाख, हिंगणे-बोंबाळे-किरकसाल-गोंदवले रस्ता सुधारणेसाठी १७ लाख, बिजवडी-राजवडी-दानवलेवाडी-वावरहिरे-मार्डी रस्त्यासाठी ३७.६० लाख, श्रीपालवन-गाडेवाडी-शिंदी खुर्द रस्ता ३७.६० लाख, खुटबाव-भालवडी-रांजणी-पळशी-पाणवण-काळचौंडी रस्त्यासाठी ३७.६० लाख, मसाई-बोनेवाडी-देवापूर-पळसावडे रस्ता सुधारणेसाठी ३७.६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
माण-खटाव मतदारसंघातील ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरणासाठी ३०५४ लेखाशीर्षकांतर्गत पांढरवाडी ते कोळेवाडी रस्त्यासाठी २३.६० लाख, म्हसवड-भाटकी-पर्यंती रस्त्यासाठी २३.६० लाख, डबरमळा-सावंतवाडी-कोकरेवाडी रस्ता २३.६० लाख, म्हसवड-पुळकोटी रस्त्यासाठी २३.६० लाख, वरकुटे म्हसवड- मोटेवाडी रस्ता २३.६० लाख, प्रजिमा ४९ ते खुटबाव ग्रामीण मार्गासाठी २३.६० लाख, राज्यमार्ग ते मनकर्णवाडी-पळशी रस्ता २३.६० लाख, महादेव मंदिर-कुकुडवाड ते राज्यमार्गापर्यंतच्या रस्त्यासाठी २३.६० लाख, सोकासन-डंगीरेवाडीसाठी २३.६० लाख, मोही-डंदीरेवाडी जोड रस्ता, मोगराळे-पाचवड रस्ता, तोंडले ते मोगराळे, शिखर शिंगणापूर देऊळ रस्ता, टाकेवाडी ते पांगरी, वडगाव ते प्रजिमा, गुप्तलिंग देऊळ रस्ता या रस्त्यांसाठी प्रत्येकी २३.६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दहीवडी-कोकरेवाडी-शेरेवाडी ते बिदाल रस्ता २२ लाख रुपये, कुमठे ते कुरोली रस्ता १३.५० लाख, घाडगे वस्ती ते निमसोड १२.५२ लाख, औंध-खबालवाडी रस्त्यासाठी १३.५० लाख, नडवळ-काळेवाडी रस्ता १३.५० लाख, गोरेगाव कदमवाडी निमसोड रस्ता १२.५० लाख, नायकाचीवाडी ते प्रजिमा रस्त्यासाठी १४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.