लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वत:वर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही स्वाती महाडिक यांनी दु:ख विसरून देशरक्षणाचा ध्यास घेतला. आर्मीचे खडतर प्रशिक्षण घेतले. लेफ्टनंट झाल्यानंतर शहीद संतोष महाडिक यांची जन्मभूमी असलेल्या परळी खोºयात त्या प्रथमच आल्या. त्यावेळी या आधुनिक राणी लक्ष्मीबाईचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून ‘मैं भी स्वाती बनुंगी’ असा निर्धार जणू आरे गावातील जिजाऊच्या लेकींनी केला.
सातारा तालुक्यातील आरे या मूळ गावी शनिवारी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शहीद कर्नल संतोष महाडिक वनराई मित्र समूहाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराजे भोसले, डॉ. अविनाश पोळ, वीरमाता कालिंदा घोरपडे, विजय कदम, जयवंत महाडिक, ज्योती महाडिक, सुवर्णा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना लेफ्टनंट स्वाती महाडिक म्हणाल्या, ‘शहीद जवान संतोष महाडिक यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. ते नेमहीच शालेय विद्यार्थ्यांमध्ये रमायचे. उद्याचे भविष्य या तरुण-तरुणींच्या हातात आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांचे बालपण आरे, पोगरवाडी, सातारा परिसरात गेले. त्यांना देशसेवेची आवड होती. लष्करात असतानाही ते गावच्या विकासाची तळमळ बोलून दाखवायचे.’‘संतोष यांचे पहिले प्रेम वर्दीवर होते. त्यांनी जी वर्दी घातली होती, त्या वर्दीचे स्टार आता माझ्या खांद्यावर आले आहेत, ही खूप अभिमानास्पद बाब आहे. ही तर सुरुवात आहे अजून ध्येय खूप लांब आहे. मी शिक्षिका होते. एका आॅफिसरची पत्नी होते. लष्कराबद्दल जास्त माहिती नव्हती. माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. लष्कराबद्दल जास्त माहिती नव्हती.
शिवाजीराजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त करून महाडिक कुटुंबीयांशी असलेली जवळीक स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कार्याचा आढावा घेतला. लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाल्याने सध्या त्या एकवीस दिवसांच्या प्री-आॅन लिव्हवरअसून, पुढील काही दिवसांत त्या देहूरोड आॅर्डिनस्न कोरमध्ये रुजू होणार आहे.मुला-मुलींमध्ये भेदभाव नको‘मी लष्कराकडे फक्त वयाची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आम्हाला दिवस-रात्र कळत नव्हती. माझ्या तुलनेत इतर आॅफिसर्स वयाने किमान आठ वर्षांने लहान होत्या. तरीही मी त्यांच्यात सामावून जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले. अजून खूप काही शिकायचे आहे. मुला-मुलींमध्ये भेदभाव नको त्यांना ज्या गोष्टींमध्ये आवड असेल ती गोष्ट त्यांना साध्य करुद्यात,’ असे आवाहन यावेळी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी केले.