फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.‘राज्यात भाजप सरकारकडून फक्त आश्वासनाची खैरात सुरू असून, शेतकरी देशोधडीला लागलेला असून, आश्वासनाची नुसती खैरात भाजप सरकार करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफीच्या नावाखाली झुलवून ठेवण्यात आले आहे.संपूर्ण कर्जमाफी न करता शेतकºयांना नियम व अटी एवढ्या लावलेत की, कोणालाही या कर्जमाफीचा फायदा होत नाही. फडणवीस सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केला. जनतेच्या आणि शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार काहीच काम करीत नसल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.‘शेतकºयांना नवीन कृषिपंपचे वीज कनेक्शन देणे गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारला जमले नसून भरमसाठ लाईट बिलामुळे जनता अडचणीत आली आहे, असा आरोप आमदार दीपक चव्हाण यांनी केला. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणाºया भाजप सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून यापुढेही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘भाजप सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून वीज, आरोग्य, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा देणे त्यांना जमलेले नाही. शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असून, भाजप सरकारने राजीनामा देण्याची मागणी सुभाष शिंदे यांनी केली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.या मोर्चात नगराध्यक्षा नीता नेवसे, सभापती रेश्मा भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलावडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, भीमदेव बुरुंगले व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.कमी कार्यकर्ते आल्याने आंदोलन दोन तास उशिरा..या हल्लाबोल मोर्चाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कमी कार्यकर्त्यांमुळे दीड तास उशिरा झाले. तालुक्यात सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही कार्यकर्ते कमी आल्याने भाषणात संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि सुभाष शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपने शेतकºयांना देशोधडीला लावले : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:13 PM