शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

‘भाजप’ने पाठीत खंजीर खुपसला--गजानन किर्तीकर :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:52 PM

वाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती.

ठळक मुद्देवाई येथील जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात टीकास्त्र०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : ‘देशातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारभाराला कंटाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणबाजीला भुलून बळी पडून जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला. शिवसेनेने पंचवीस वर्षे मैत्रीचे नाते टिकवून ठेवल्यानेच भाजपला सत्तेत येता आले. सत्तेत येताच ‘भाजप’ने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप केले आहे,’ अशी टीका शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी केली.वाई येथे सोमवारी आयोजित शिवसेनेच्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील,आमदार शंभूराज देसाई, युगंधरा साळेकर, राजेश कुंभारदरे, चंद्रकांत जाधव, हर्शल कदम, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शारदाताई जाधव, अजित यादव, हरिदास जगदाळे, अनिल शेंडे, यशवंत घाडगे, रणजितसिंह भोसले, महेश शिंदे, किरण खामकर, गणेश जाधव, योगेश चंद्रस, विवेक भोसले उपस्थित होते.किर्तीकर म्हणाले, ‘जनतेचा भाजप सरकारविषयी भ्रमनिरास झाला आहे. मोदी सरकारने काळ्या पैशाच्या विरोधात केलेली नोटबंदी, जीएसटी कर प्रणाली हे दोन्ही निर्णय भाजपच्या अंगलट आले आहेत. यामुळे देशात महागाई वाढली. सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात भाजपविरोधी लाट असून, शिवसेनेने या ‘भाजप’विरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी संघटन मजबूत करण्याची गरज आहे. २०१९ च्या विधानसभेचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.’संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘कुठे आहेत ते अच्छे दिन. महाराष्ट्रातील जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न स्वप्नच राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतील ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी शिवसेना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकºयांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असतानाही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.’विजय शिवतारे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात पाणी सिंचनाचे जलसंधारणाचे काम हे शिवसेनेनेच केले आहेत. १९९५ मध्ये युतीचे शासन असताना कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून शिवसेनेने जलसंधारणाचे शंभर टक्के प्रश्न मार्गी लावले. शिवसेनेच्या कामाचे श्रेय येथील प्रस्थापित पक्षनेते घेत आहेत.’आमदार शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वाई, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव, खंडाळा, जावळी, खटाव, फलटण तालुक्यांतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.मोदी नवसाचं बाळदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नवसाचे बाळ असून, त्याचे लाड पुरविता-पुरविता भाजपला नाकीनऊ आले आहे. लाडाच्या हट्टापायी भाजपला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.