शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ

By दीपक शिंदे | Published: June 04, 2024 5:16 PM

..अन् शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं. 

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा, वाई, कऱ्हाड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या मतदारसंघांचा समावेश होतो. कराड दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघांमधून उदयनराजे भोसले यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली. या मतदारसंघांमध्ये शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, याच ठिकाणाहून उदयनराजेंना अधिक मते मिळाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं. वाई मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. कोरेगाव त्याबरोबरच सातारा तालुकाही शशिकांत शिंदे यांना सुरुवातीला चांगली आघाडी मिळाली. त्यानंतर, या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आणि कोरेगावात सुमारे पाच हजार, तर सातारा लोकसभा मतदारसंघात सुमारे २९ हजारांनी मताधिक्य मिळविले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला.सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे विजयी होतील, अशा पद्धतीचे सुरुवातीच्या फेऱ्यांचे अनुमान काढले जात होते. सुरुवातीला सुमारे २१ हजारांचे मतांचे मताधिक्य हे शशिकांत शिंदे यांना मिळालं होते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी विजयी मिरवणूक काढून आपला गुलालही उधळला. मात्र, काही कालावधीतच उदयनराजेंनी पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी घेतल्याने त्यांच्या या आनंदावरती विरजण पडलं. कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर हे खूप अटीतटीचे असलेले मतदारसंघ होते. या मतदारसंघांमधून भाजपने जोरदार मुसंडी मारली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कऱ्हाड या ठिकाणी सभा घेतली होती. या सभेचा निश्चितच फायदा उदयनराजेंना झाला, असे म्हणता येईल. त्याबरोबरच दक्षिण आणि उत्तरमधील कार्यकर्त्यांनीही भाजपचा चांगल्या प्रकारे केला, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी उदयनराजेंना लीड घेणं सोपं झालं, तसेच त्यांचा विजयही सुकर झाला.

साताऱ्यात भाजपचा पहिला खासदारस्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच स्थान मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी भाजपचा पहिला खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची राहिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे