शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साताऱ्यात युतीच्या उमेदवाराला विजयी करु - धनंजय महाडिक

By नितीन काळेल | Updated: February 22, 2024 15:51 IST

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची साताऱ्यात सभा

सातारा : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे. तरीही साताऱ्यात महायुतीतून उमेदवार देतील त्याचा विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानेच २४ फेब्रुवारीला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा दौऱ्यावर येत आहेत,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार महाडिक बोलत होते. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या दौरा नियोजनासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महाडिक यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मकरंद देशपांडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.खासदार महाडिक म्हणाले, मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीत महाअधिवेशन झाले. यामध्ये भाजपने ३७० तर भाजप आघाडीने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे सातारा, हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. यासाठी आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे २४ फेब्रुवारी रोजी या तीन मतदारसंघात बैठक घेत आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद  मोदी यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालीच जगातील पाचवी आऱ्थिक महासत्ता भारत देश झाला आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे. पंतप्रधान मोदी यांनीच देशातील २५ कोटी लोकसंख्येला दारिद्र्यातून बाहेर काढले आहे. पण, काॅंग्रेस सरकारच्या काळात घोटाळ्याचीच श्रृंखला होती. आता केंद्र शासनाने त्यांच्या कार्यकाळातील श्वेतपत्रिका काढली आहे. यावर काॅंग्रेस पक्ष काहीच बोलला नाही. याचाच अऱ्थ त्यांना हे मान्य आहे असे होते, असेही खासदार महाडिक यांनी निक्षून सांगितले. 

साताऱ्यात शिवराजसिंह चौहान यांची सभा..मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे २४ फेब्रुवारीला कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते सातारा दाैऱ्यावर येणार आहेत. साताऱ्यातील गांधी मैदावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी बैठकीत नियोजन झाले आहे, अशी माहितीही खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकPoliticsराजकारण