स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भाजपाकडून काॅंग्रेसचा निषेध; पोवई नाक्यावर आंदोलन

By नितीन काळेल | Published: December 8, 2023 02:37 PM2023-12-08T14:37:01+5:302023-12-08T14:38:37+5:30

पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

BJP condemns Congress for insulting freedom hero Savarkar; Agitation at Powai Naka | स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भाजपाकडून काॅंग्रेसचा निषेध; पोवई नाक्यावर आंदोलन

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भाजपाकडून काॅंग्रेसचा निषेध; पोवई नाक्यावर आंदोलन

सातारा: राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी पक्षाच्या धोरणाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपच्यावतीने पोवई नाक्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, स्वातंत्र्यवीरांचा अनुल्लेख करणे, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल शंका उत्पन्न करुन सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करणे हे एकच काम काँग्रेसकडे शिल्लक आहे. यासाठी काँग्रेस वारंवार प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनीही सावरकरांचा अपमान केला आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही.

यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, जिल्हा चिटणीस सुहास राजेशिर्के, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, माजी नगरसेवक किशोर पंडित, आशा पंडित, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, प्रशांत जोशी, चंदन घोडके, रवी आपटे, नजमा बागवान, रोहिणी क्षिरसागर, प्रिया माने, अनिता बोडस, निशा जाधव, अमोल कांबळे, अमोल टंकसाळे, चैतन्य बोडस, अमित काळे, राजेश माजगावकर, पोपट महाडिक, चंद्रकांत माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP condemns Congress for insulting freedom hero Savarkar; Agitation at Powai Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.