कालगाव, ता. क-हाड येथे ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यस्तरीय सहकारी संस्था लेखापरीक्षण समिती अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, क-हाड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, सभापती प्रणव ताटे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, लालासाहेब पाटील, तानाजीराव जाधव, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच संगीता चव्हाण, चिंचणीच्या सरपंच गीता अनपट यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, क-हाड उत्तर मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारची कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून मतदारसंघात विकासाचा महामेरू उभा केला आहे. सहकार पणन हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. ती जबाबदारी बाळासाहेब पाटील यांनी दूरदृष्टीने सांभाळली आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे.
यावेळी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सभापती प्रणव ताटे, देवराज पाटील आदींची भाषणे झाली. बांधकाम विभागाचे आर.जे. पाटील, विक्रम शिंदे, हणमंत जाधव, कंत्राटदार हणमंत मटूर, दत्तात्रेय चव्हाण, अशोकराव संकपाळ, भास्कर चव्हाण, जयवंत चव्हाण, योगेश चव्हाण उपस्थित होते. मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी आभार मानले.
- चौकट
इमारतीला निधी कमी पडणार नाही!
कालगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू करण्यात आले असून सध्या २४ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांनी केले. त्यास अनुसरून सर्व उपस्थित मान्यवरांनी आपापल्या परीने निधीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देत ग्रामपंचायतीच्या कामाला निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले.
फोटो : ०४केआरडी०२
कॅप्शन : कालगाव, ता. क-हाड येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.