शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचे ‘सिंचन’!

By admin | Published: October 19, 2015 11:18 PM

साताऱ्यात कलगीतुरा : तटकरेंविरोधातील आरोपाला मुंडेंकडून प्रत्युत्तर

सातारा : ‘सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आरोपींच्या पिंजऱ्यात असून, ते लवकरच तुरुंगात दिसतील,’ असे भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी सांगितले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ता असल्याने भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करीत असून, ते या आरोपांतून तावून-सुलाखून निघतील, असे प्रतिपादन केले. राज्यातील फडणवीस सरकार ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती करीत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरातील भाजपने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भाजप प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनी सोमवारी दुपारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती. ‘आघाडी सरकारने मागील १५ वर्षांत अनावश्यक धरणे बांधली,’ असा आरोप कांताताई नलावडे यांनी केला. तोच धागा पकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी ‘सिंचन घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश असल्याने तेही काही दिवसांत तुरुंगात दिसतील,’ असे म्हटले.दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच धनंजय मुंडे विश्रामगृहावर आले. ते एका दालनात थांबले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता मुंडे म्हणाले, ‘सत्ता असल्याने भाजप पदाधिकारी असे आरोप करीत आहेत. ‘सिंचन’ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीला आमचे नेते सामर्थ्याने सामोरे जात आहेत. सत्तेत नसताना घोटाळ्यांचे आरोप झालेल्या भाजपच्या नेत्यांना सत्ता आल्यावर पक्षाने क्लीन चिट दिली आहे,’ असा पलटवारही त्यांनी केला. (प्रतिनिधी)