शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कऱ्हाडात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन; केला ठाकरे सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 6:42 PM

कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देकऱ्हाडात भाजपने केला ठाकरे सरकारचा निषेधमहाराष्ट्र बचाव आंदोलन; मेरा आंगण मेरा रणांगणला प्रतिसाद

कऱ्हाड: कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ मे रोजी मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला अनुसरून शहरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोर हे आंदोलन सामाजिक अंतराचे भान ठेवून केले. यावेळी काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रेबीन, काळे मास्क, काळे शर्ट याचा आवर्जून उपयोग केल्याचे पाहायला मिळाले.भाजपचे प्रवक्ते, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत कऱ्हाड येथील राहत्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

पंढरपूर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर येथे निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक होते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सोमवार पेठेत घरासमोर हे आंदोलन केले.असे होते फलकमहाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव ठाकरे मात्र स्वत:च्या घरात, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार अशा आशयाच्या निषेधाचे फलक भाजप कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते. तर काळे कपडे, काळे मास्क, काळे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना नियंत्रणात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. गरीब, गरजू, लोकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना यांना पिणाऱ्यांचा प्रश्न पडला असून, घरपोच दारू देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. म्हणूनच गांभीर्याची जाण नसणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.- शेखर चरेगावकरप्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश.

टॅग्स :BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारSatara areaसातारा परिसर