शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:12 PM

राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे,ह्ण असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाणराज्यपालांच्या भूमिकेबाबत आमच्या मनात शंका

कऱ्हाड : राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे,ह्ण असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष अप्पा माने, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च रोजी जागतिक महामारी घोषित केली. मात्र आमच्याकडे २५ मार्चला लॉकडाऊन करण्यात आले. केंद्र सरकारने १४ दिवस वाया घालविले. त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. वास्तविक आपल्या सरकारने मुंबई विमानतळावर परेदशातून येणारे प्रवासी याबाबत काळजी घ्यायला हवी होती. अथवा विमानतळ त्याचवेळी बंद करायला हवे होते. मात्र त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आमचे पंतप्रधान ट्रम्प यांचे स्वागत करण्यात मग्न होते. तर मध्यप्रदेशचं सरकार पाडण्यात त्यांना जास्त रस होता.कोरोना संकट हाताळायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना स्वत:च्या घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्थाही हे सरकार नीट करू शकलेले नाही. भारताची एवढी मोठी नाचक्की यापूर्वी कधीच झालेली नाही. यातून सावरण्यासाठी सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे; पण २ लाख कोटींच्यावर त्यांनी खर्च केलेला नाही. १८ लाख कोटींची नुसती आश्वासने आहेत. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर येईल, असे वाटत नाही.ह्ण असेही आ. चव्हाण म्हणाले.मला ट्रॅप करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंयदोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाजातील ह्यहे सरकार आमचं नाही, सेनेचे आहे,ह्ण या आशयाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत विचारताच; मला कोणीतरी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतंय. मी असे काही बोललोय असं आठवत नाही. त्या संभाषणातील माझा आवाज खरा की खोटा याचा मी अभ्यास करतोय, असे उत्तर चव्हाण यांनी दिले.... ते सरकार ठरवेल!तुमचे एकेकाळचे निकटचे सहकारी, विधान परिषद सदस्य आमदार आनंदराव पाटील यांची आमदारकीची मुदत संपत आली आहे. त्याऐवजी कोणाला संधी देणार? याबाबत विचारताच ह्यआता तो निर्णय सरकार घेईल. एवढेच उत्तर देणे त्यांनी पसंद केले.भ्रमात राहू नकाएचआयव्हीसारख्या आजारावर चाळीस वर्षांत लस शोधायला यश आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या आजारावर काही महिन्यांत लस तयार होईल, या भ्रमात कोणी राहू नका. त्यामुळे स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसरBJPभाजपा