सातारा : सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगम माहुली येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे प्रवीण सूर्यकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र संगम माऊली विकास पॅनल पुरस्कृत केले होते. या ठिकाणी अटीतटीची निवडणूक होऊन तीर्थक्षेत्र संगम माऊली विकास पॅनलला पाच जागा मिळाल्या. विरोधकांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले. अनेक दशके राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या गावात त्यांना विरोधात बसावे लागले आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रवीण सूर्यकांत शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
या निवडीबद्दल खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, समस्त संगम माऊली ग्रामस्थ यांनी सरपंच प्रवीण शिंदे यांचे कौतुक केले आहे.
(प्रवीण शिंदे यांचा आयकार्ड फोटो आहे)