शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

निवडणुकीसाठी भाजपची उदयनराजेंना ‘आॅफर’-चंद्रकांतदादा अन् बापटांसोबत अर्धा तास चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 11:40 PM

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची

ठळक मुद्देविश्रामगृहात गुप्तगू

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शनिवारी रात्री कमराबंद चर्चा केली. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरूहोती. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे, अशी आॅफरही देण्यात आल्याची चर्चा याठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा रविवारी साताऱ्यात येत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच ही गोपनीय बातचीत झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

साताऱ्यात भाजप पक्षाचे मोठे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाची जागा पाहण्यासाठी तसेच पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवारी सायंकाळी साताºयात आले होते.मंत्री पाटील सायंकाळी सात वाजता विश्रामगृहावर दाखल झाले. पदाधिकाºयांशी चर्चा करत असताना मंत्री गिरीश बापट विश्रामगृहावर दाखल झाले. यानंतर काही वेळाने खासदार उदयनराजे भोसले हे देखील तेथे आले.

प्रतापगड सूटमधून ते अजिंक्यतारा सूटमध्ये आले. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, अमित कुलकर्णी, सुधीर पवार यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले दाखल झाले.

यानंतर चर्चेला मध्येच थांबवत दोन्ही मंत्र्यांनी उदयनराजे यांच्याशी कमराबंद चर्चा केली. चर्चेचा वृत्तांत गोपनीय ठेवण्यात आला असला तरी आगामी निवडणुकीत उदयराजे यांनी भाजपतर्फे लढावे, असा आग्रह धरल्याची चर्चा विश्रामगृहावर दबक्या आवाजात सुरू होती.बापट म्हणाले, ‘राजे.. माझ्या खुर्चीवर बसा’अजिंक्यतारा सूटमधील अ‍ॅन्टी चेंबरमध्ये उदयनराजे प्रवेशले, तेव्हा मंत्री गिरीष बापट आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले, ‘राजे.. तुम्ही या खुर्चीवर बसा. नाहीतर पंतांसमोर राजे बसले, अशी पुन्हा बातमी व्हायची,’ असे मिस्कीलपणे म्हणत बापट यांनी उदयनराजेंना समोरच्या मुख्य खुर्चीवर बसविले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPoliticsराजकारण