सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने २१ कोटी रुपए थकविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये काळ्या फिती लावून आणि गाडीवर काळे झेंडे फडकवून निषेध नोंदविला.याबाबत अधिक माहिती अशी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात २३० शाळांमधून ८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची पुर्तता शासनाने केली नाही.
या अंर्तगत सुमारे २१ कोटी रुपए शासनाने थकवल्याच्या निषेधार्थ इनडिपेंटन्ड इंग्लिश स्कुल असोसिएशनच्यावतीने सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी काळा दिवस पाळला. शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर काळे झेंडे लावण्यात आले होते.दरवर्षी आरटीई योजनेंतर्गत वाढत असलेली विद्यार्थी संख्या व त्यांची शैक्षणिक शुल्क याची रक्कम कोट्यावधी रूपयांमध्ये जात आहे. याचा संपूर्ण बोजा कायमस्वरूपी विना अनुदानित असलेल्या शिक्षण संस्थेवर पडत आहे. शासनाची निधी देण्याबाबतची उदासिनता अशीच राहिली तर भविष्यातया शाळा बंद पडतील, अशी भितीही असोसिएशनने व्यक्त केली आहे.दरम्यान, शासनाचा निषेध करताना शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान न करण्याचं निश्चित केल्याने अध्यापनात कोणताच खंड पडला नाही. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे नुकसान न करण्याच्या असोसिएशनच्या भूमिकेचे पालकांच्यावतीने कौतुक करण्यात आले.