वाई : सातारा येथील देवा ग्रुप व सिद्धनाथवाडीतील युवा कार्यकर्ता रोहित बरकडे व रोहित पंडित यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका शाळा क्रमांक दहा येथे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत आणि नगरसेविका रेश्मा जायगुडे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अक्षय ब्लड बँक, सातारा यांच्या मदतीने घेतलेल्या या शिबिरात ५३ युवकांनी रक्तदान केले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात रक्तदान शिबिर आयोजित करून एक प्रेरणादायी व आदर्शवत उपक्रम राबविला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना अशी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असून, तो भरून काढण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे.
यावेळी शिवसेनेचे कऱ्हाड उपतालुकाप्रमुख काकासाहेब पवार, नगरसेवक प्रदीप जायगुडे, संजय चव्हाण, शंकरराव वाघ, मोहन जायगुडे, शाळा क्रमांक १० व्यवस्थापन समिती अध्यक्ष युगल घाडगे, बापूराव खरात, उमेश जायगुडे, संतोष जायगुडे, पप्पू बरकडे, बाळासाहेब बरकडे, राहुल जायगुडे, नितीन चवरे, गोट्या सोनवणे, सागर पवार, गौरव मेस्त्री, आशू शिंदे, अविनाश लोखंडे उपस्थित होते.