सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमिताने ‘लोकमत’ने नातं रक्ताचं ही चळवळ उभारली आहे. याला जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील प्रतापगंज पेठ, बुधवार पेठेतील नागरिकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये ५५ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलाही उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यातील रविवारी उम्मीद फाउंडेशन, जय श्रीराम प्रतिष्ठान आणि धीरज घाडगे मित्र समूह यांच्या संयुक्ताने ‘लोकमत’ने हे शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन उम्मीद फाउंडेशनच्या अध्यक्षा अफशा देवानी, जय श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतापगंज पेठेतील नागरिक, मित्र परिवार व उम्मीदचे पदाधिकारी तसेच ‘लोकमत’चे अनुप चौरासिया उपस्थित होते.
ए पॉझिटिव्ह रक्तदाते
विद्याधर जाधव, विशाल जाधव, किरण बल्लाळ, प्रभाकर साळुंखे, निशा साळुंखे, हृषीराज जाधव, नाजिम मुजावर.
बी पॉझिटिव्ह रक्तदाते
अभिजित सांगलीकर, शुभम चव्हाण, नीलेश लकेरी, रोहित धनवडे, आकाश लकेरी, सनी साळुंखे, आदित्य माळी शिलावंत, अथर्व धनवडे, रतनसिंह कदम, अंजली घाडगे, धीरज घाडगे, सचिन भोसले, अमित नलावडे, प्रीतम नलवडे, नीलेश लकेरी, शरद जोशी, आकाश जाधव, सुजित देशमुख, रोहन खोपे, प्रसाद साळुंखे, सचिन लिमकर.
बी निगेटिव्ह
अनिल अटकरे, गोपाळ लाहोटी.
ओ पॉझिटिव्ह
प्रणव कुलकर्णी, राजेश सूर्यवंशी, ओमकार खंडाळकर, दिनेश दीक्षित, राहुल वेळ्ळाल, आशिष डोळस, अभिषेक जाधव, शुभम रसाळ, आशिष मोरे, अरबाज देवानी, संदीप बोरगे, किरण साळुंखे, संदीप भिसे, योगिता क्षीरसागर, आरती सूर्यवंशी, दीपक मोरे, प्रसाद साळुंखे.
ओ निगेटिव्ह
संग्राम परुळेकर.
ए. बी. पॉझिटिव्ह
शिवा सकट, दादासाहेब साळुंखे, निखिल शिंदे, रवींद्र सूर्यवंशी, अजिम शेख, गणेश धनवडे.
१२सातारा-ब्लड बँक
साताऱ्यात रविवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उम्मीद फाउंडेशनच्या अध्यक्षा अफशा देवानी, जय श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.