तांबवे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या आवाहनानुसार तांबवे येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत फुटबॉल टीमच्यावतीने पुणे रुबी हाॅस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ७७ युवकांनी रक्तदान केले.
यापूर्वीही वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, नदीकाठचे घाट स्वच्छता, क्रीडा सामने असे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, यशवंत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन निवासराव पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सलिम मुजावर, माजी सरपंच जावेद मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, संजय लावंड, डाॅ. विकास पाटील, विलास पाटील उपस्थित होते.
संस्थेचे सचिव युवराज पाटील, अनिल बाबर, विक्रम पाटील, रवींद्र पाटील, वैभव डोंगरे, करीम मुल्ला, आकाश फले, ऋषी पाटील यांची उपस्थिती होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी डाॅ. एस. एम. बोरा, सुनील पाटील, संदीप निगडे, सुजाता लंघे, सुधीर भोसले, शंकर काळोखे, उमेश जोशी, किरण साठे, आण्णासाहेब पवार, सागर पवार, रणजित देवकर, सुनील जगताप यांनी परिश्रम घेतले. राहुल कुलकर्णी, श्वेता कुलकर्णी, संभाजी पाटील यांचा गौरव करण्यात आला. दादासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कोयनाकाठचे अध्यक्ष राजदीप पवार, उपाध्यक्ष संकेत पाटील यांनी स्वागत केले. अतुल पाटील यांनी आभार मानले.