फलटण : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यातील आंदरूड येथे भाजपच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जगताप तसेच गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, ‘पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ज्या पद्धतीने मतदारसंघात काम करीत आहेत, त्यांच्या विचाराने या तालुक्यात काम होणे गरजेचे आहे. खऱ्याअर्थाने कोरोना संकटात लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. असे उपक्रम समाजाचे हिताचे असतात. (वा. प्र.)
१९रणजितसिंह नाईक-निंबाळकर
आंदरुड येथे शुक्रवारी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केेले होते. याचे उदघाटन जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अमोल सस्ते यांच्या उपस्थितीत झाले.