संत निरंकारी मिशनच्यावतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून या परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करून संत निरंकारी मिशनच्यावतीने बांधीलकी जोपासण्यात आली. सातारा झोनमध्ये झोनलप्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रीय सेवादल संचालक दीपक शेलार व किशोर माने यांच्या सहकार्याने संत निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिर पार पडले. हे शिबिर शासनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून मंडळाच्या आदेशान्वये पार पडले. शिबिराचे उद्घाटन नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते झाले. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयाने शिबिराला सहकार्य केले. रक्तपेढी विभागाचे डॉ. बोंबे यावेळी उपस्थित होते. शिबिरात ९९ निरंकारी अनुयायांनी रक्तदान केले. यासाठी सातारा सेवादल युनिटच्या सर्व सेवादल अधिकारी व अनुयायांचे सहकार्य लाभले. भीमराव जाधव, नीलेश काटकर, दत्तात्रय गोरे आदी उपस्थित होते.
फोटो : २९केआरडी०१
कॅप्शन : सातारा येथे संत निरंकारी भवनमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ९९ जणांनी रक्तदान केले.