खटाव : खटाव येथे शहाजीराजे महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक व माजी आमदार चंद्रहार पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्षय ब्लड सेंटर, सातारा व शहाजीराजे महाविद्यालयातीळ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रामचंद्र पवार व प्रा. प्रमोदिनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान श्रेष्ठदान असल्याने दात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी अक्षय ब्लड सेंटरचे टीम मेंबर प्रसाद कुलकर्णी, राजू साळुंखे, सागर जाधव व महाविद्यालयाचे आजी-माजी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व इच्छुकदाते कोविड पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन व कोविडच्या नियमांचे पालन करत उपस्थित होते.