स्वरांजली गणेश कोकरे ही चिमुरडी साताऱ्यातील जानकीबाई झंवर विद्यालयात पहिलीत शिकते. पण तिचे मूळ गाव कुसुंबीमुऱ्हा. कुसुंबीमुऱ्हा येथील डोंगरदऱ्या, शेती, जनावरं, कोंबड्यांसोबतच स्वरांजलीचे बालपण गेले. त्यामुळं तिची निसर्गाशी चांगली गट्टी जमली आहे. तिचे वडील गणेश हेही हौशी चित्रकार आहेत. त्यांची चित्रकला पाहून स्वरांजलीलाही चित्रांची आवड निर्माण झाली आहे.
पहिलीतील मुलांना शिसपेन्सील कशी धरायची हे समजावून सांगताना पालक वैतागून जातात. त्या वयात स्वरांजली अतिशय उत्तमपणे ब्रश हातात धरत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती कागदावर कॅनव्हासवर कुंचल्याचे फटकारे मारत होती. तिच्यातील चित्रकलेचे सुप्त गुण वडिलांनी हेरले अन् तिच्यात चित्रकलेविषयी आवड निर्माण केली. गणेश कोकरे चित्रे काढताना तिला सोबत घेऊन तिच्यासमोर काढत असतात. स्वरांजलीनेही अनेक गोष्टी उमजून घेतल्या आहेत.
चित्रे काढण्यापूर्वी दोघे चर्चा करतात. ती काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे दिली जातात. त्यानंतर चित्रांतील रचना, रंगांची माहिती वडील देतात. पण चित्र पूर्ण झाल्यानंतर मोठ्या माणसांनाही हेवा वाटेल असे ती काढत असते.
lll
- जगदीश कोष्टी
सातारा.
कोरोनावरही चित्र
कोरोना लॉकडाऊन काळात सर्वचजण घरी होते. काही कामही नव्हते. त्यामुळे गणेश कोकरे दररोज चित्रे काढत होते. या काळात त्यांनी असंख्य चित्रे काढली. त्यांच्यासोबत स्वरांजलीही असायची. तिनेही या काळात शंभराहून अधिक चित्रे काढली आहेत. त्यातील कोरोनाच्या चित्राला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कोट
माझ्याबरोबरच स्वरांजली दररोज सकाळी फिरायला येत असते. निसर्गाच्या सान्निध्यात फिरत असताना तिला अनेक कल्पना सुचतात. तसेच प्रश्नही पडतात. त्यांना आपण उत्तर दिले अन् चित्र काढ असे सांगितले, तर ती लगेच काढते.
- गणेश कोकरे, वडील
७
वय वर्षे
१००
चित्रे साकारली
फोटो २१स्वरांजली०१,०२,०३.