सातारा : कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील युवकाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनंतर सोमवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला.कोडोली परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात दोन युवक पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी दुपारी बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह लगेच सापडला होता. शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान या शोधकार्यात सक्रिय झाले होते.गंगाप्पा गारी आदर्श (वय २०, रा. कोनापुरम, अनंतपूर आंध्रप्रदेश) याचा मृतदेह घटनेनंतर काही तासांतच शोधपथकाच्या हाती लागला. मात्र, सागर एस सिद्धाप्पा (वय १९, रा. नेहरू कॉलनी, गौरी बिदनूर कर्नाटक) या युवकाचा रविवारी दिवसभर शोध घेऊनतही तो सापडला नव्हता. दरम्यान, सोमवारी पुन्हा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच सागर सिद्धाप्पाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला.
नदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:49 PM
कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील युवकाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनंतर सोमवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला.
ठळक मुद्देनदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडलारेक्स्यू टीम आणि ट्रेकर्सचे जवान शोधकार्यात सक्रिय