सातारा : कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयासमवेत फिरायला गेलेल्या मामा भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदेर्वी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर मामाचा मृतदेह सापडला होता. मात्र, भाचीचा मृतदेह पाच तासांनंतर शोधण्यास महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले.निकिता अजय पुनदीर (वय ३२), उदय जगन्नाथ पवार (वय ४५, रा. वेळेकामथी, सध्या रा. मुंबई) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मामा-भाचीचे नाव आहे.वेळेकामथी (ता. सातारा) येथील दत्तजयंतीच्या यात्रेनिमित्त मामा-भाची कुटुंबीयासमवेत वेळेकामथी येथे आले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पवार आणि पुनदीर कुंटुंबीय कण्हेर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक निकितीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी मामा उदय पवार यांनी धरणात उडी घेतली. परंतु निकिताने मामाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले होते.
कण्हेर धरणात बुडालेल्या भाचीचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:28 PM
सातारा : कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयासमवेत फिरायला गेलेल्या मामा भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदेर्वी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या ...
ठळक मुद्देकण्हेर धरणात बुडालेल्या भाचीचा मृतदेह सापडलानिकिताने मामाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले