शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

बोलेमामांचा वडापाव आजपासून पुन्हा सातारकरांच्या सेवेत

By admin | Published: October 01, 2014 1:10 AM

सातारा : राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बोलेमामांच्या कन्या बुधवारी नव्या उमेदीने

सातारा : राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बोलेमामांच्या कन्या बुधवारी नव्या उमेदीने नव्या आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. ‘लोकमत’च्या आवाहनाला सातारकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्यानंतर मामांचा वडापावचा गाडा पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होत आहे.अनंत चतुर्दशीच्या रात्री राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून चंद्रकांत बोले यांचा मृत्यू झाला होता. ‘बोलेमामांचा वडापाव’ हे सातारकरांच्या जिभेवर कोरलेले नाव कायम राखण्याचा निर्धार त्यांच्या कन्यांनी बोलून दाखविल्यानंतर ‘लोकमत’ने सातारकरांना मदतीचे आवाहन केले होते. दुसऱ्याच दिवसापासून विविध संस्था, मंडळे, कार्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यक्तिगतरीत्याही बोले कुटुंबीयांकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. बघता-बघता सुमारे दोन लाख रुपयांचा निधी उभा राहिला आणि बोलेमामांच्या कन्यांनी बुधवारपासून (दि. १ आॅक्टोबर) वडापावची गाडी सुरू करण्याचा निर्णय घेऊन तयारी केली. ‘निवृत्तिनाथ कट्टा’ या सेवानिवृत्त व्यक्तींच्या ग्रुपने मंगळवारी आर्थिक मदत दिली. ग्रुपमधील व्ही. के. कुलकर्णी, माधवराव गोडबोले, नानासाहेब द्रवीड, पापाभाई तडसरकर, गनीभाई शेख, सुरेश महाजनी, मुकुंदराव कोल्हटकर, ज्ञानेश्वर निकम, मनोहर जालीहाल, रमेश वेलणकर, डॉ. अरुण कुलकर्णी, रामभाऊ जाधव, रमेश ठोंबरे, जे. एस. शिर्के, एस. बी. मुजूमदार, शशिकांत पिंपळखरे, चंद्रकांत भस्मे, सुरेंद्र सबनीस, शरद डिके, विश्वास दांडेकर, बाबासाहेब दबडे, बी. जी. जोशी, उदय जोशी, बाळासाहेब चवरे, के. व्ही. लिमये, अरुण रायरीकर, अजित शहाणे, राजाभाऊ दामले, ए. के. गर्गे, व्ही. जी. ग्रामोपाध्ये आणि पुरुषोत्तम शेठ यांनी बोले कुटुंबीयांसाठी मदत जमा केली. दरम्यान, सुहास राजेशिर्के यांनीही बोले कुटुंबीयांना मदत केली. (प्रतिनिधी)