शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

माणमध्ये बंधारे, जलयुक्तची किमया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 10:45 PM

पाणीपातळीत वाढ : पीक पद्धतही बदलणार; पाणीटंचाई कमी होण्यास मदत

दहिवडी : जिहे-कटापूर, उरमोडी पाणी योजना पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत माण तालुक्याचा पाणी प्रश्न संपणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच तालुक्यात सिमेंट साखळी बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान व जलयुक्त शिवार अभियानातून ३८४ सिमेंट बंधारे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रांवर समतोल चर गाळ काढणी, बंधारे दुरुस्ती अशी अनेक कामे झाली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पावसाचा थेंब ना थेंब जिरला असून, पाणी पातळीमध्ये १.५ ते ३ मीटरने वाढ झाली आहे. आता पीक पध्दतीतही बदल होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५१ गावांत पाणलोट विकास कार्यक्रम राबविला गेला. त्यानंतर बनगरवाडी, सोकासन, कासारवाडी, भालवडी या ठिकाणी शाश्वत कामे झाली. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात २४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. त्यामध्ये १२२१ कामे पूर्ण झाली. तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे लोकसहभागातून अनेक गावांनी चित्र पालटवले. लोधवडे, दानवलेवाडी, बिदाल अशी सुरुवातीला मोजकी गावे होती. आता गोंदवले, वरकुटे-मलवडी, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी या गावांनी विशेषत: जलसंधारणावर भर दिला.अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात अनेक गावांना भेट देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पांढरवाडी सारख्या गावात ७ साखळी बंधारे झाले. १ पाणलोट मधून तर ३ लोकसहभागातून बंधारे झाले. २२५ टीसीएम पाणी आणले गेले. पांढरवाडीत प्यायला पाणी नाही तेथे आज पाणी पातळी वाढल्याचे दिसते. दुर्गमभागात पाणी वाढल्याने आज १५ ते ३ मीटरने पातळी वाढली आहे. त्यामुळे ३०० फुटांवर न लागणारे पाणी आज ५० फुटांवर लागत आहे. पांढरवाडी, महिमानगड परिसरात वाटाणा पीक ७०० ते ८०० हेक्टर, मूग २ ते २५०० हेक्टर, मका या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षातून एक पीक घेतले जात होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन वर्षांमध्ये पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्तमधून प्रचंड कामे झाल्याने पाण्याची पातळी १.५ ते ३ मीटरने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारीशासनाचे पाठबळ व लोकसहभाग. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रोत्साहन यामुळे गावचा कायापालट झाला. आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, आटलेल्या बोअरवेलमधून पुन्हा पाण्याचे स्त्रोत वाढले आहेत. - सुभाष घाडगे महाराज, पांढरवाडी