शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बोराटे, अंकुशवर दावा ठोकणार : शेखर गोरे

By admin | Published: October 31, 2014 12:47 AM

सातारा : शेखर गोरे व अंकुश गोरे यांच्यात भागीदारीत असलेल्या मे. कमल एंटरप्राईजेस या संस्थेच्या संयुक्त खात्यातून

सातारा : शेखर गोरे व अंकुश गोरे यांच्यात भागीदारीत असलेल्या मे. कमल एंटरप्राईजेस या संस्थेच्या संयुक्त खात्यातून बनावट सही करून ५ कोटी ७० लाख रुपये काढून, त्या पैशाचा संगनमताने अपहार केल्याच्या तक्रारीवरून शेखर गोरे व इतरांवर गुन्हा नोंद केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात अंकुश गोरे व महेश बोराटे यांच्या विरुद्ध ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे शेखर गोरे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.याबाबत शेखर गोरे यांनी सांगितलेली माहिती अशी की, ‘मी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून ‘रासप’या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली होती. मी त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो. माझे निवडणूक प्रतिनिधी दत्तात्रय कुंडलिक घाडगे यांनी दि. १५ आॅक्टोबर ते १९ आॅक्टोबर अखरेच्या कालावधीत मतपेट्या सुरक्षिततेच्या बाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेजची सीडी मिळावी, यासाठी दि. २७ आॅक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी २५८ माण विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे लेखी अर्जान्वये दिलेली होती. हे फुटेजमधील काही आक्षेपार्ह माहिती माझ्या हाती लागल्यास त्याचा विपरित परिणाम जयकुमार गोरे यांच्या राजकीय वाटचालीवर होईल म्हणून त्यांनी आमदार पदाचा दुरुपयोग करून हे फुटेज मला मिळू दिले नाही, तर अंकुश गोरे व जयकुमार गोरे यांनी संगनमताने माझ्याविरुद्ध खोटी केस दाखल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.’ शेखर गोरे म्हणाले, ‘खरी परिस्थिती अशी असून, मे. कमल एंटरप्रायजेस ही फर्म अंकुश गोरे व शेखर गोरे यांची पार्टनरशिपमधील कंपनी असून, या कंपनीचे रजि. आॅफिस अंकुश गोरे यांच्या पत्त्यावर आहे व बँकेतील खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नं. हा देखील अंकुश गोरे यांचाच आहे. परंतु, गेली एक ते दीड वर्षे फर्ममध्ये असणारे संबंध दुरावले होते. फर्मच्या बँकेतील खात्यावर गेल्या एक-दीड वर्षात कोणताही व्यवहार झाला नव्हता.या फर्मचा टॅक्स भरण्यास विलंब झाला व या फर्मचे रजि. आॅफिस अंकुश गोरे यांच्या पत्त्यावर असल्यामुळे अंकुश गोरे यांना या गोष्टीचा त्रास होत होता. त्यामुळे अंकुश गोरे यांचे मार्गदर्शक सीए जैन यांनी मला संपर्क केला व विनंती केली की, मे. कमल एंटरप्रायजेस या फर्मचा टॅक्स भरणे गरजेचे आहे. परंतु अंकुश गोरे हे माझे व्यवसायातील पैसे देणे असल्यामुळे मी तयार होत नव्हतो. तेव्हा जैन यांनी माझे पैसे देण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर मे. कमल एंटरप्रायजेसचा टॅक्स रक्कम ८५ लाख ३६ हजार १९१ एवढ्या रक्कमेचा चेक दि. १२ सप्टेंबर रोजी जैन यांच्या नावे टॅक्स भरणे कामी दिला, त्याच दिवशी अंकुश गोरे यांनी स्वत: पाच लाख एवढ्या रकमेचा चेक स्वत:साठी घेतला व माझी येणे असलेली रक्कम पाच कोटी ७० लाख (चेक नं. ०००७२५) असे तीन वेगवेगळे चेक तयार केले. त्यापैकी माझे देय रकमेचा ५ कोटी ७० लाखांचा चेक एक महिन्याच्या मुदतीचा म्हणजेच १३ आॅक्टोबर २०१४ या तारखेचा होता. त्यानुसार मी तो चेक दि. १३ आॅक्टोबरला दिला.जर मी खोट्या सह्या केल्या असतील तर त्यांनी बँकेत जमा केलेला चेक वटते वेळीस अंकुश गोरे यांना त्यांच्या मोबाईलवर खात्यातून रक्कम कमी झाल्याबाबतचा मेसेज मिळाला, त्यावेळी त्यांनी याची तक्रार का केली नाही? गुन्हा नोंद करून घेताना पोलिसांनी बँकेतील चेकवरील सह्या न तपासता दबावापोटी गुन्हा का नोंद केला? चेकवरील अंकुश गोरे यांची सही खोटी आहे, तर बँकेतील अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम वर्ग कशी केली?, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)