दोन्ही हात गमावल्यानंतर दिनेशकुमार यांना मनातून खूपच दु:ख झाले. आपल्याला आता राखी कोण, कशी बांधणार, ही शंका त्यांच्या मनात येत होती. पण पाचही चुलत बहिणी त्यांच्या कोपरापासून वरच्या बाजूला राख्या बांधतच होत्या. आपल्या आयुष्यात काही वेगळेच घडले आहे, हे त्यांनी चुकूनही दाखवून दिले नाही. या दिवशी त्या न चुकता राख्या बांधतात.
पाचहीजणींचे लग्न झाले आहे. निशा ही लखनऊ, आशा कानपूर, गुडिया ही शिकवाबाद, दिल्ली, राजश्री आग्रा तर बिना ही सातार रोड येथे असते. त्यातील चौघी फारच दूर असतात. तरीही राखी पोर्णिमेच्या अगोदरच त्या पोस्टाने राखी पाठवून देतात. अन् घरी आल्यावर मुली, पत्नी यांच्याकडून मोठ्या प्रेमाने बांधून घेऊन दिनेशकुमार राखीचा स्वीकार करतात.
- जगदीश कोष्टी
अभिमानानं ऊर भरुन येतो...
समाजात अनेकदा संपत्तीवरुन बहीण-भावात भांडणं होत असलेली आपण पाहतो. दोघंही धडधाकट असून, राखी बांधायला येत नाहीत. अन् आपल्याला एकही हात नसताना पाच-पाच बहिणी हात भरुन राख्या बांधतात. या प्रसंगामुळे अभिमानानं ऊर भरुन येतो, अशा भावना दिनेशकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.