शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

गावोगावच्या पालख्यांचा कृष्णातीरी संगम!

By admin | Published: August 29, 2016 10:13 PM

कऱ्हाडात कृष्णाबाई यात्रा उत्साहात : हजारो भाविकांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांचे आयोजन

कऱ्हाड : येथील ग्रामदैवत कृष्णाबाईची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो भाविकांनी यात्रेसाठी उपस्थिती लावली होती. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथील कृष्णाबाईची यात्रा भरविली जाते. या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. कृष्णा नदीकाठी असलेल्या हेमाडपंथीय मंदिरात सिंहारूढ अशा अवस्थेत अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप असलेल्या कृष्णाबाईची मूर्ती ठेवण्यात आली आहे. कृष्णा प्रवाहाकडे पाहत असलेल्या अवस्थेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कृष्णाबाईच्या मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. चाफळचे बाजीपंत करकरे यांनी कोकणात बसविण्यासाठी पांढऱ्या पाषाणाची देवीची मूर्ती उत्तर हिंदुस्थानातून तयार करून आणली होती; पण त्यांच्या पत्नीलाही ती मूर्ती कृष्णाकाठी स्थापन करावी व कऱ्हाडच्या अंताजी बहिरव आवटे यांच्या स्वाधीन करावी, असा दृष्टांत झाला. म्हणून त्यांनी कऱ्हाडला कृष्णाकाठी झोपडीवजा जागेत देवीची स्थापना केली. भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे येथे राहत. त्यांच्याकडे कामासाठी आलेला गुजराथी ब्राह्मण निपूत्रिक मरण पावला. त्यामुळे त्याच्या बेवारशी तीन हजार रुपयांच्या मालमत्तेचा विनियोग झोपडीच्या जागी सध्याचे दगडी हेमाडपंथीय बांधकाम असलेले देऊळ बांधण्याच्या कामी त्यांनी केला व देवीला ‘कृष्णाबाई’ हे नाव दिले. त्यानुसार १७०९ मध्ये कृष्णाकाठी देवीची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते.या उत्सव काळात वाळवंटात मोठा मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी देवीची उत्सव मूर्ती ठेवून तिच्यावर हळदीकुंकू वाहण्यासाठी महिलावर्गाने गर्दी केली होती. सकाळी दुग्धाभिषेकाने देवीच्या मूर्तीस स्नान घालून तिची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी पूजानंतर महाआरती करण्यात आली. यानंतर देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. (प्रतिनिधी)सिंहारूढ कृष्णाबाई... कऱ्हाडकरांचे ग्रामदैवत असलेली कृष्णाबाई देवीची मूर्ती ही दशभुजा, सिंहारूढ असून, महिषासुराचा वध करतानाची आहे. मूर्तीची मान तिरपी असून, ती कृष्णा-प्रवाहाकडे पाहत आहे. अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप असलेल्या कृष्णाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. भुईमुगाच्या शेंगा अन् चटणी-भाकरीकृष्णाबाई यात्रेसाठी गावोगावातून देवी-देवतांच्या पालख्या घेऊन आलेल्या भाविकांनी कृष्णा नदीच्या काठी देवीचे दर्शन घेऊन अंघोळ केली. प्रसादात शेतातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा अन् चटणी- भाकरी खाल्ली.हलगी अन् नृत्यांचा आविष्कारश्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरत असलेल्या कृष्णाबाईच्या यात्रेसाठी ग्रामीण भागातून आलेल्या विविध देव-देवतांच्या पालख्यांपुढे हलगी, ढोल अन् वाजंत्री होते. हलगी आणि ढोलाच्या आवाजावर काही भाविकांनी ठेका धरला होता. यावेळी धनगर समाजातील भाविकांकडून आकर्षक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.