कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उधळपट्टी, लोकांची गर्दी, बडेजाव, मानपान आदी गोष्टी थांबल्या आहेत. प्रत्येकजण सामाजिक बांधिलकी जपत आनंद सोहळ्यात माणुसकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
नडशी (ता. कऱ्हाड) येथील जर्मनीमध्ये नोकरी करत असलेल्या युवकाने आपला विवाह साधेपणाने करून ऑक्सिजनची गरज आणि भविष्यातील धोके ओळखून वृक्षारोपण करून कोरोनामध्ये एक आदर्श घालून दिला.
नडशी येथील लक्ष्मण नलवडे यांचे चिरंजीव सूरज नलवडे हे सध्या उच्च पदावर जर्मनी येथे कार्यरत आहेत, तर कांबिरवाडी येथील चंद्रकांत कांबिरे यांची कन्या माधुरी यांचा विवाह वराच्या घरी आगदी मोजक्याच लोकांत झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नियम पाळत कोणताही गाजावाजा न करता घरच्या घरी विवाह सोहळा पार पाडला. लग्न सोहळा झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन लोकांना कमी पडत असल्याने भविष्यात त्याची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपत नलवडे कुटुंबीयांनी वृक्षारोपण केले.
कोट.....
भविष्यात असेच लग्नसोहळे झाले पाहिजे, समाजोपयोगी उपक्रम राबवले पाहिजेत. हेच ओळखून आम्ही वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
- गणेश नलवडे...नडशी (ता. कऱ्हाड)
२६नडशी
फोटो ओळ : नडशी (ता. कऱ्हाड) येथे वधू-वरांनी वृक्षारोपण केले.