शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

नव्या वर्षात पुलांच्या कामाची ‘उड्डाणे’!

By admin | Published: December 10, 2015 11:57 PM

शेंद्रे ते शिरवळपर्यंत १२ पुलांना डेडलार्ईन : रखडलेल्या कामांना अखेर मुहूर्त; सेवारस्त्यांची कामेही युद्धपातळीवर सुरू

प्रदीप यादव---सातारा -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास कमी वेळेत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांची कामेही सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते पारगावपर्यंतच्या टप्प्यात १२ उड्डाणपुलांचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. काही पुलांची कामे या ना त्या कारणाने रखडली आहेत. परंतु नवीन वर्षात रखडलेल्या सर्व पुलांची कामे सुरू होणार असून कामाची ‘डेडलाईन’ही निश्चित झालेली आहे, अशी माहिती ‘भूसंपादन’चे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांचे काम सुरू केल्याने एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणची कामे अपूर्णावस्थेत असल्यामुळे आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महामार्ग नको, पायवाट परवडली, असे म्हणण्याची वेळ वाहनधारक व प्रवाशांवर आली आहे. कामाचे योग्य नियोजन नसल्यामुळे सर्वत्र बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, येणाऱ्या अडचणी मार्गी लावल्याने २०१६ या नवीन वर्षात बहुतांश कामे मार्गी लागणार आहेत.सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते खंडाळा-पारगाव या टप्प्यात एकूण १२ उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शेंद्रे, शिवराज पेट्रोलपंप, वाडेफाटा, लिंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशीविहीर, बोपेगाव, सुरूर-वेळे, पारगाव (भोर फाटा) आणि केसुर्डी फाटा याठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महामार्गावर उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. मात्र, अद्याप बहुतांशी कामे अपूर्णावस्थेत आहेत. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आणि महामार्ग ‘मृत्यूचा मार्ग’ बनल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवासी, वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. ‘न्हाय’च्या ढिसाळ नियोजनामुळे आजपर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षांत तरी ‘न्हाय’ने कामाचे योग्य नियोजन करून एक-एक काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरवळ, खंडाळ्यातील सेवारस्त्यांचे रूंदीकरणमहामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शिरवळ आणि खंडाळा शहरातील सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणार असून याचे काम जानेवारी २०१६ मध्ये सुरू करणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.खंबाटकी घाटातील रस्त्याचेही रुंदीकरणपुण्याहून सातारकडे येताना वाहनचालकांना खंबाटकीचा अवघड घाट चढून यावे लागते. घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकदा कंटेनर अडकून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. घाटरस्ता अवघड असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. यावर तोडगा म्हणून महामार्ग प्राधिकरणाने खंबाटकी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मार्च २०१६ पर्यंत तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.घाटातील मंदिराचा वाद मिटायला हवा खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरण करताना घाटातील खामजाई देवीचे मंदिर इतरत्र हलवावे लागणार आहे. त्यासाठी या मंदिराचा वाद मिटणे गरजेचे आहे. रस्त्यापासून आतल्या बाजूस मंदिरासाठी मोठी जागा देण्याचे नियोजन झाले आहे. तसेच याठिकाणी पाण्याची सोयही केली जाणार आहे. मात्र, शिवसैनिकांचा मंदिर हलविण्यास विरोध आहे.