शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पोवई नाक्याजवळ बैल बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘बैल आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा...!,’ असं म्हणतच बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अनोखे आंदोलन केले. सुमारे एक हजार बैल जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोरच दावणीला बांधण्यात आली होती.बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी केंद्र्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘बैल आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा...!,’ असं म्हणतच बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अनोखे आंदोलन केले. सुमारे एक हजार बैल जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोरच दावणीला बांधण्यात आली होती.बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी केंद्र्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या मागणीसाठी सोमवारी राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले.दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला बैलबाजाराचे स्वरूप आले होते. तसेच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पर्यायी रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची कोंडी होती.आंदोलनात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जालना, औरंगाबाद, बीड, अमरावती, नगर यासह अन्य जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले आहेत.यावेळी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलांना बांधत घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली.यावेळी शेतकºयांनी बैलाच्या पाठीवर ‘मला वाचवा, पेटा हटवा’ अशा पद्धतीचे स्लोगन लिहिल्याचे दिसून येत होते. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्र्वांनी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मोर्चा काढला. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सर्वजण पुन्हा आंदोलनस्थळी आले.दिवसभरात विविध संघटना, नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. बैलाची गैरसोय होऊ नये, यासाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती.या परिसरातील वाहतूक दुपारी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागाला. दिवसभर वाहतूक बंद असल्याने पर्यायी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ बैलासह राज्यव्यापी आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्णांतून, तालुक्यांमधून, गावांमधून मोठ्या प्रमाणात बैलासह बैलगाडी चालक-मालक आंदोलनस्थळी येत होते. बघता-बघता जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला बैलबाजाराचे स्वरूप आले.अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे प्रताप झांजुर्णे, ब्रम्ह पैलवान, अक्षय घोरपडे, विष्णू यादव, सागर बर्गे, रोहन बर्गे, अनिल काटकर, अण्णा पैलवान, अक्षय मोरे सह राज्यभरातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.साताºयातून येणाºया-जाणाºयांसाठी हे अनोखे आंदोलन होते. त्यामुळे या मार्गावरून जाणारे लोक थांबून विचारपूर करत होते. तर काहीजण या आंदोलनाचे मोबाईलवर चित्रीकरण करत होते. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत होती. ती टाळण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेट आडवे लावले होते. तरीही एखादी दुसरी कार आली तर तिला बाहेर पडणे अवघड जात होते.अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोवईनाक्याकडून कोरेगाव रोडला जाणारी वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळविली.दिवाळीत आंदोलनया आंदोलनाला आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्यसरकारने कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून लवकरात लवकर बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी केली. हे आंदोलन घरचे असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत, अशी भावना संघटनेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली.आम्हीच झाकतो डोळेबैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी मालक मंडळी आंदोलन करत असताना त्यांना सोबत देणाºया बैलाने असे डोळे झाकून शासनाच्या चुप्पीचे दर्शन घडविले.घेतल्याशिवाय राहत नाय..जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे दोन बैल मोठ्या आवाज करत होते. जणू घेतल्याशिवाय राहत नाही, असंच त्यांचं म्हणणं होतं.