शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

म्हसवडच्या सराफानेच लुटले अकलूजच्या सराफाला, चौघांना अटक; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By दीपक शिंदे | Published: September 28, 2022 8:09 PM

विशेष म्हणजे ही लूटमार म्हसवडमधील एका सराफाने कट रचून केली असल्याचे तपासात निष्पन्न

सचिन मंगरुळेम्हसवड : अकलूजच्या सराफाला वाटेत अडवून त्यांच्याकडील १५ लाखांचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून ४३५ ग्रॅम सोन्यासह १७ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे ही लूटमार म्हसवडमधील एका सराफाने कट रचून केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय ३४, रा. धुळदेव, ता. ताण, जि. सातारा), योगेश तुकाराम बरडे (३५, रा. पिलीव रोड, बरडे वस्ती, माळशिरस, जि. सोलापूर), रामदास विठ्ठल गोरे (२०, रा. म्हसाळवाडी, ता. माण, जि. सातारा), रणजित भाऊ कोळेकर (२०, रा. धुळदेव, ता. माण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराफ व्यावसायिक सुरेशकुमार हिंमतराव कुमावत (३९, रा. अकलूज, जि. सोलापूर) हे २७ जुलै २०२२ रोजी म्हसवडमधील सराफ व्यावसायिकांना दागिने देण्यासाठी आले होते. त्याच दिवशी सायंकाळी दुचाकीवरून ते परत जात असताना वाटेत अडवून त्यांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील १५ लाखांचे दागिने चोरून नेले होते. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच या जबरी चोरीचा मुख्य सूत्रधार हा म्हसवडमधील दुर्वा कोळेकर हा सराफ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अन्य सहकाऱ्यांचीही नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी संबंधितांना पालघर, नालासोपारा येथून ताब्यात घेतले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या जबरीचा चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत काैशल्याने छडा लावला. या चोरट्यांकडून ४३५ लगड स्वरूपातील सोने आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, उत्तम दबडे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस