शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बैलांच्या गाड्यांना आता ट्रॅक्टरचा लळा!

By admin | Published: February 09, 2015 10:05 PM

झटपट ऊसतोडीला पसंती : जनावरांची संख्या घटली; जुनी वाहनं खरेदी करण्याकडे कामगारांचा ओढा

राहुल  तांबोळी - भुर्इंज ऊस वाहतुकीसाठी आता बैलांऐवजी ट्रॅक्टरचाच वापर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. बैलांच्या खांद्यावर ज्या गाडीचे जू ठेवले जायचे तेच जू आता ट्रॅक्टरला जोडून बैलगाडीमालक ऊस वाहतूक करत आहेत. येथील एकट्या किसन वीर कारखान्यावर बैलगाडीचा कासरा सोडून ट्रॅक्टरचे स्टिअरिंग हाती घेणाऱ्यांची संख्या शेकडो झाली असून, त्यामुळे बैलगाड्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. ऊसतोडणी करणारे आता वाहतुकीसाठी ट्रॅक्टर गाडीचा वापर करत असल्याने जनावरांसह माणसांनाही सुख लाभत असून, ऊसतोडणी व वाहतूक क्षेत्रात गतीने होत आहे. या नव्या बदलामुळे ऊस वाहतूक करणारी बैलगाडी दुर्मीळ होण्याची शक्यता आहे. बैलगाडीद्वारे वाहतूक करणे मोठ्या कष्टाचे असल्याने नगर, लातूर आदी भागांतून बैल घेऊन येणारे ऊसतोडणी मजूर आता ट्रॅक्टर घेऊन येत आहेत. बैलगाडीतून दोन-तीन टन ऊस वाहतूक होते. तर याच मजुरांकडून आता बैलगाडीऐवजी नव्याने वापरात आणलेल्या ट्रॅक्टरगाडीद्वारे पाच टन ऊस वाहतूक केली जात आहे. कारखाना व्यवस्थापनही पूर्वी बैलांसाठी टायरगाड्या उपलब्ध करून देत असे, त्याचप्रमाणे या ट्रॅक्टरसाठीही टायरगाड्या उपलब्ध करून देत आहेत. बैलांद्वारे केली जाणारी ऊस वाहतूक आणि ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी ऊस वाहतूक यामधील फरक उसतोडणी व वाहतूक करणाऱ्या मजुरांना दिलासा देत आहे. त्यामुळे ‘मुंगळा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरगाडींना पसंती देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इतर ट्रॅक्टरना दोन ट्रॉली जोडलेल्या असतात. तर ऊसतोडणी मजुरांकडून बैलगाडीऐवजी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरगाडीला बैलांना जोडल्या जाणाऱ्या गाडीच्या तुलनेत काहीशी मोठी टायरगाडी वापरली जाते. बैलांना सांभळताना चारा, पेंड यासह त्यांचे आजारपण किंवा अपघात आणि ओल्या रानात बैलांची होणारी दमछाक हा सर्व त्रास सहन करावा लागतो. मात्र, ट्रॅक्टरगाडीमुळे या सर्व त्रासातून तोडणी व वाहतूक मजुरांची सुटका होत आहे. स्वत:चा त्रास कमी झाला म्हणून जेवढा आनंद या मजुरांना आहे, तेवढाच आनंद या त्रासातून बैलांची सुटका झाल्याचा आहे. नगर जिल्ह्यातील माहिजळगाव येथील बाळू कदम, राजू ननवरे, राहुल शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘बैलगाडीतून ऊस वाहतूक करताना कष्टासोबत वेळही खूप जात होता. अनेक ठिकाणी रानामध्ये तसेच रस्त्यावर चढाच्या ठिकाणी बैलांना गाडी ओढताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच कारखान्यावर गाडी पोहोचल्यानंतरही ती मोकळी होईपर्यंत बैलांचा त्रास कायम असे. बैलगाडीतील ऊस उतरविल्यानंतरच बैलांना पाणी पाजणे, पेंड व चारा देणे या कामात वेळ जातो. मात्र, या मुंगळ््यामुळे या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.’ जुन्या वाहनांना पसंती एक बैलजोडीची किंमत एक ते दीड लाख आहे. बैलांना दररोजचा लागणारा खुराक, ऊस वाहतुकीमुळे होणारा त्रास, अपघातात बैलांना होणाऱ्या दुखापतीची भीती या तुलनेत बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरगाडी हा पर्याय चांगला ठरत आहे. या वाहतुकीसाठी छोटा ट्रॅक्टर किंवा जुना ट्रॅक्टर खरेदी करून बैलांऐवजी त्याचा वापर केला जात आहे. जुने ट्रॅक्टर दीड ते दोन लाखांत तर छोटे नवीन ट्रॅक्टर तीन लाखांपर्यंत उपलब्ध होत आहेत. बैलगाडीवर एक जोडपे काम करत असेल तर पहाटे चार वाजल्यापासूनच दिवस मावळला तरी कामच सुरूच असतं. त्या दोघांनी ऊस तोडायचा, बाईने मोळ्या बांधायच्या आणि एकट्या गड्याने बैलगाडीत भरायच्या. एवढं राबून हंगामात हातावर ऐंशी हजार ते एक लाख रुपये पडतात. ट्रॅक्टरगाडीमुळे गुरांचे अन् माणसांचं राबणंही थांबत आहे. - अर्चना कदम, ऊसतोडणी मजूर एकट्या किसन वीर कारखान्यावर पूर्वी सातशे ते आठशे बैलगाड्या ऊस वाहतूक करत असत. मात्र, यंदा बहुसंख्य ट्रॅक्टरने वाहतूक होते. ऊसतोडणी मजुरांनीच हा बदल आणल्याने कारखान्याच्या वतीने त्यांना पाच टन क्षमतेच्या टायरगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. - ज्ञानेश्वर शेडगे, कृषी अधिकारी, किसन वीर कारखाना, भुर्इंज